IND vs ENG : ‘जो मैं बोलता हूँ, वो करता हूँ…!’, डकेटला रिव्हर्स स्कूप शॉट मारणं पडलं महागात, आकाश दीपने घेतली मजा, पाहा VIDEO

IND vs ENG Akash deep Send off To Ben Duckett : ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने भारतीय गोलंदाजांना आपल्या आक्रमक फलंदाजीने हैराण केले होते. सिराज, प्रसिध आणि आकाश यांच्या गोलंदाजीवर तो सहज रन काढत होता. दरम्यान, आकाश दीप आणि डकेट यांच्यात एका शॉटनंतर काहीसं बोलणं झालं. डकेटने आकाश दीपला तो बाद होणार नसल्याचं म्हटलं होतं. पण काही वेळातच आकाश दीपने डकेटला बाद करत भारताला पहिली मिळवून दिली. यानंतर आकाश दीपच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
बेन डकेटने आकाश दीपच्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हातात गेला. यानंतर आकाश दीपने डकेटसमोर उत्साहपूर्ण सेलिब्रेशन केलं. त्याने मुठी बांधत आनंद साजरा केला आणि नंतर डकेटच्या खांद्यावर हात ठेवत काही शब्द बोलला. हे सेलिब्रेशन आक्रमक वाटलं तरी त्यात मैत्रीपूर्ण भावनाही दिसली. हा क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आकाश दीपला डकेटने डिवचलं होतं –
Duckett to Akash Deep: “You can’t get me out here” – later Akash Deep gets Duckett. 👌#akash #INDvsENG #cricket #INDvsEND pic.twitter.com/OikfRUP6FV
— Satirical Tweet (@k_c_shivansh) August 1, 2025
आकाश दीप-बेन डकेटचा व्हिडीओ व्हायरल –
A much needed breakthrough for India 🔥
And a cheeky send-off for Ben Duckett 😜#SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/9YaTjcEYOn
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 1, 2025
बेन डकेटने ३८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावांची खेळी केली. त्याने झॅक क्रॉलीसोबत पहिल्या विकेटसाठी ८० हून अधिक धावांची भागीदारी करत इंग्लंडला मजबूत सुरुवात करून दिली. भारताचा पहिला डाव २२४ धावांवर आटोपली होता. त्यामुळे इंग्लंडने सामन्यात आघाडी घेतली. इंग्लंड सध्या चार सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पुढे आहे. हा सामना अनिर्णित राहिल्यासही इंग्लंड मालिका जिंकेल. भारताला मालिका बरोबरीत आणायची असल्यास हा सामना जिंकणं गरजेचं आहे.
आकाश दीपने चौथ्यांदा केली डकेटची शिकार –
आकाश दीपने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आतापर्यंतच्या ५ डावांमध्ये या दोघांमध्ये झालेल्या लढतीत आकाश दीपने तब्बल ४ वेळा डकेटला बाद केले आहे. डकेटने आकाश दीपच्या ५५ चेंडूंचा सामना करताना केवळ ४० धावा जोडल्या, ज्यात त्याची सरासरी फलंदाजीचा स्कोअर १० आहे. यामध्ये ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. आकाश दीपचे डकेटविरुद्धचे हे शानदार प्रदर्शन त्याच्या गोलंदाजीतील कौशल्य दाखवते.





