Ashwin Slams BCCI : बड्या कंपन्यांचे उदाहरण देत अश्विनने बीसीसीआयला सुनावलं; म्हणाला, “जर रोहितला हटवायचेच होते, तर…”
Ashwin Slams BCCI : १९ जुलाई रोजी लॉर्ड्सवर होणारा सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीयसामना असेल, असे वृत्त समोर येत असतानाच आता भारताचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विनने या संपूर्ण वादात उडी घेतली आहे.

R Ashwin Slams BCCI and Team Management about Rohit Sharma : भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या संभाव्य अंताची चर्चा सध्या शिगेला पोहोचली आहे. १९ जुलाई रोजी लॉर्ड्सवर होणारा सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीयसामना असेल, असे वृत्त समोर येत असतानाच आता भारताचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विनने (R Ashwin) या संपूर्ण वादात उडी घेतली आहे.
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर थेट बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर आणि अंतर्गत वातावरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याच्या मते खेळाडूंना संघातून बाहेर काढताना त्यांच्याशी थेट आणि सन्मानपूर्वक संवाद व्हायला हवा.
बड्या कंपन्यांचे उदाहरण देत अश्विनने सुनावले –
अश्विनने संघातून वगळण्याच्या प्रक्रियेवर बोलताना कॉर्पोरेट कंपन्यांचे उदाहरण दिले. तो म्हणाला, “बघा, संघातून कोणालाही वगळले जाऊ शकते, तो निवड समिती, कर्णधार आणि प्रशिक्षकांचा अधिकार आहे. पण माझा मुद्दा असा आहे की, खेळाडूशी थेट बातचीत झाली पाहिजे. मोठ्या कंपन्यांमध्ये जेव्हा कर्मचाऱ्यांना काढतात, तेव्हा वरिष्ठ स्तरावरील ज्या व्यक्तीने कंपनीला खूप काही दिले आहे, त्यांच्याशी सन्मानपूर्वक चर्चा केली जाते.”
YOUR THOUGHTS ???
Ravichandran Ashwin gives a great example of communication when it comes to remove a top guy like Rohit Sharma. 🔥
And I think he is absolutely right about it. Rohit Sharma deserved better treatment from the selectors.
(Ash ki Baat w/Vimal Kumar) https://t.co/hpe7gXqmpG pic.twitter.com/6Bgba2yL1l
— TheFakeFakeer (@TheFakeFakeer) July 17, 2026
अश्विन पुढे म्हणाला, “ज्या खेळाडूने देशासाठी दोन दशके (२० वर्षे) सर्वोत्तम कामगिरी केली, अनेक सामने जिंकून दिले, त्याला बाहेर करताना अधिक चांगला आणि आदराचा मार्ग अवलंबता आला असता.”
…तर हा निर्णय चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच घ्यायला हवा होता –
R. ASHWIN QUESTIONS BCCI ON ROHIT SHARMA & SAYS, “THERE SHOULD HAVE BEEN CLEAR COMMUNICATION AFTER CHAMPIONS TROPHY” 🚨🚨
Legendary Spinner Ravichandran Ashwin has criticised the way Rohit Sharma has been treated by the authorities.
He presents the stats of Rohit & says this… pic.twitter.com/ZzpR4w8FWU
— TheFakeFakeer (@TheFakeFakeer) July 17, 2026
अश्विनने निवड समितीच्या टायमिंगवरही बोट ठेवले. त्याच्या मते, जर रोहित शर्माला वनडे संघातून हटवायचेच होते, तर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर लगेचच हा निर्णय घ्यायला हवा होता. आगामी दक्षिण आफ्रिकेतील २०२७ विश्वचषकासाठी युवा यशस्वी जैस्वाल फॉर्मात असला, तरी तिथे रोहितच्या प्रदीर्घ अनुभवाची टीम इंडियाला प्रचंड गरज भासेल, असे अश्विनने स्पष्ट केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदानंतर रोहितला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते आणि आता तो कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार असल्याच्या वृत्ताने अश्विन कमालीचा नाराज दिसला.





