Laxman Sivaramakrishnan : BCCI मध्ये वर्णभेद? माजी खेळाडू आरोप करत कॉमेंट्रीतून निवृत्त; अश्विनच्या ‘त्या’ कमेंटने जखमेवर चोळले मीठ!
Laxman Sivaramakrishnan : आयपीएल २०२६ चा हंगाम अवघ्या आठवड्यावर आलेला असताना भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.

Laxman Sivaramakrishnan Racism Charge BCCI : भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी बीसीसीआयसाठी कॉमेंट्री करण्याला रामराम ठोकला आहे. मात्र, ही निवृत्ती साधी नसून त्यांनी क्रिकेट बोर्डावर वर्णभेदाचा (Racism) अत्यंत गंभीर आरोप केला आहे. गेल्या २३ वर्षांत आपल्याला कधीही टॉस, पिच रिपोर्ट किंवा प्रेझेंटेशनसाठी संधी देण्यात आली नाही, असा दावा त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर केला आहे.
“माझ्या रंगा मुळेच मला डावललं”
शिवरामकृष्णन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी बीसीसीआयच्या कॉमेंट्रीतून निवृत्त होत आहे. २३ वर्षांत मला कधीही प्रेझेंटेशनमध्ये घेतले गेले नाही. नवे लोक पिच रिपोर्ट आणि टॉसचे काम करतात, रवी शास्त्री प्रशिक्षक असतानाही हेच घडत होते.” यावर एका चाहत्याने विचारले असता, “तुमच्या रंगा मुळे तुम्हाला टॉससाठी बोलावले जात नाही का?” त्यावर शिवरामकृष्णन यांनी “बिल्कुल” असे उत्तर देत वर्णभेदाच्या आरोपावर शिक्कामोर्तब केले.
If I have not been used for TOSSES and PRESENTATION for 23 years and new comers come in do pitch report Tosses Presentation even when Shastri was coaching, what do you think could be the reason
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) March 20, 2026
अश्विन आणि शिवरामकृष्णन यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ –
If I have not been used for TOSSES and PRESENTATION for 23 years and new comers come in do pitch report Tosses Presentation even when Shastri was coaching, what do you think could be the reason
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) March 20, 2026
शिवरामकृष्णन यांच्या या घोषणेनंतर भारताचा स्टार ऑफ स्पिनर आर. अश्विन याने त्यावर केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे. अश्विनने उपरोधिकपणे “आयपीएलमधूनच कमेंट्री का सोडत नाही?” असा सवाल केला. या दोघांमधील संबंध गेल्या काही काळापासून ताणलेले आहेत. शिवरामकृष्णन यांनी अश्विनला ‘खराब गोलंदाज’ म्हटले होते, तर अश्विनने शिवरामकृष्णन यांचे कॉल्स उचलणे बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
Oh no! Why not this IPL? https://t.co/ZufOluzyoG
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) March 20, 2026
शिवरामकृष्णन यांची कारकीर्द –
केवळ १७ व्या वर्षी कसोटी पदार्पण करणाऱ्या शिवरामकृष्णन यांनी ९ कसोटी सामन्यांत २६ विकेट्स आणि १६ वनडे सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर १५४ विकेट्स आणि पाच शतके आहेत. मात्र, त्यांच्या या अचानक निवृत्तीने आणि आरोपांनी आयपीएल सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली आहे.





