Rohit Sharma Reaction On Sarfaraz Khan Run Out : मुंबईचा फलंदाज सर्फराज खानने राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने पहिल्या डावात प्रेक्षकांची मने जिंकली. सर्फराज खानने कसोटी कारकिर्दीतील पहिल्या डावात जबरदस्त फलंदाजी केली. त्याने आक्रमकपणे धावा करत पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात इंग्लंडची गोलंदाजी उद्ध्वस्त केली.
सर्फराज 66 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. त्याला शतक झळकावता आले नाही, पण प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली. तो आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना स्टेडियममध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांनी उठून टाळ्या वाजवल्या.
IND vs ENG 3rd Test 1st day Live Score : पदार्पणाच्याच डावात सरफराजचे तूफानी अर्धशतक….
सर्फराजने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. दिवसाचा खेळ संपण्याच्या काही वेळापूर्वीच तो धावबाद झाला. वास्तविक, डावाच्या 82 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजा स्ट्राइकवर होता. जेम्स अँडरसनच्या चेंडूवर त्याने मिड-ऑनच्या दिशेने एक शॉट खेळला. तो 99 धावांवर खेळत होता. जडेजा एक धाव घेत शतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होता. तो धावत पुढे गेला आणि मग थांबला. दुसऱ्या टोकाला उभा असलेला सर्फराज तोपर्यंतबराच पुढे आला होता. मिड-ऑनला उभ्या असलेल्या मार्क वुडने थेट स्टंपवर थ्रो मारल्याने सर्फराज पहिल्या डावात धावबाद झाला. अशा परिस्थितीत त्याच्याकडे परतायला वेळच उरला नव्हता आणि त्याच्या तुफानी खेळीचा अंत झाला.
Due to the wrong call of Jadeja, #SarfarazKhan was run out
Still a great debut by Sarfaraz Khan pic.twitter.com/txP4bmaMdZ
— TIND Posting (@tindposting) February 15, 2024
अन् रोहित शर्माला संताप अनावर…
धावबाद झाल्यानंतर सर्फराज खूपच निराश दिसत होता. त्याने एकदा जडेजाकडे पाहिले आणि नंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान, कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. सर्फराज धावबाद होताच रोहित संतापला. तो ड्रेसिंग रूममध्ये उभा होता. त्याने रागाने आपली टोपी खाली फेकून दिली. जडेजाने धाव घेण्याच्या निर्णयाने तो निराश झाल्याचे दिसत होते. त्यामुळे सर्फराजला त्याची विकेट गमवावी लागली. तो ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावरून पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावणार असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही.
A heart-breaking end for SarfarazA heart-breaking end for Sarfaraz.
Sarfaraz Khan Run Out For 62
62 (66)
Robit Sharma is angry😤 #INDvsENGTest #INDvsENG #RohitSharma𓃵 pic.twitter.com/7g5o7YL9t4— MY CAPTAIN (@qadeer74593) February 15, 2024
सर्फराज खानने पदार्पणाच्या कसोटीत चांगली खेळी केली, पण हा युवा फलंदाज ज्या प्रकारे धावबाद झाला, त्यामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा रागाच्या भरात नियंत्रणाबाहेर गेला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार ड्रेसिंग रूममध्ये संतापला.
Rohit Sharma threw his cap in frustration after Sarfaraz Khan got run out. pic.twitter.com/FQ3efmv5Fn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 15, 2024
रोहित शर्माने रागाच्या भरात टोपी फेकली आणि त्यानं केलेल्या कृतीचा हा फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच सोशल मीडिया वापरकर्ते सातत्याने कमेंट करून आपला अभिप्राय देत आहेत.
दरम्यान, राजकोट येथील तिसऱ्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma ) नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 5 गडी गमावून 326 धावा केल्या आहेत. सध्या रवींद जडेजा ( Ravindra Jadeja ) 110 धावांवर नाबाद असून कुलदीप यादव एका धावेवर नाबाद आहे. इंग्लंडकडून आतापर्यंत मार्क वुडने तीन, तर टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.
भारताकडून यशस्वी जैस्वाल 10 धावा करून बाद झाला, शुभमन गिल खाते उघडू शकला नाही, तर रजत पाटीदार पाच धावा करू शकला. रोहितने कसोटी कारकिर्दीतील 11वे शतक झळकावले. रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा डाव 131 धावांवर संपुष्टात आला. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आणि विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतीय संघाने जिंकली. आता तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरली आहे. हा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे.