India Beat Zimbabwe : फलंदाजीनंतर गोलंदाजीतही भारतीय युवा ब्रिगेडचा जलवा! झिम्बाब्वेची दाणादाण उडवत भारताने जिंकली मालिका
India Beat Zimbabwe : झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ९० धावांनी धुव्वा उडवला आहे.

India Beat Zimbabwe 2nd T20I Shreyas Iyer Series Win Abhishek Ishan Game changer : आयर्लंड आणि इंग्लंडमधील सलग दोन टी-२० मालिकांमधील पराभवानंतर अखेर भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ९० धावांनी धुव्वा उडवला आहे. या दणदणीत विजयासह भारताने मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली असून, श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली संघाने आपली पहिली टी-२० मालिका खिशात घातली आहे. या विजयात इशान किशन आणि अभिषेक शर्माचं योगदान मोलाचं ठरलं.
इशानच्या फटकेबाजीच्या जोरावर उभारला २१९ धावांचा डोंगर –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर वैभव सूर्यवंशी (२०) आणि अभिषेक शर्मा (८) स्वस्तात माघारी परतले. मात्र, त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर (२५) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावा जोडल्या. इशान किशनने (Ishan Kishan) ४४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८१ धावांची स्फोटक खेळी केली. तर उपकर्णधार तिलक वर्माने (Tilak Varma) अवघ्या २९ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६० धावा कुटल्या. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद २१९ धावांचा डोंगर उभा केला.
Innings Break!
Solid fifties from Ishan Kishan and Tilak Varma propel #TeamIndia to a strong total 🎯
Over to our bowlers to defend this 🙌
Scorecard ▶️ https://t.co/Z8UUziVx8d#ZIMvIND pic.twitter.com/1LM7Yv4qyF
— BCCI (@BCCI) July 25, 2026
अभिषेकने ३ विकेट्स घेत झिम्बाब्वेला १२९ धावांत गुंडाळलं –
Flurry of wickets 🔢#TeamIndia inching closer to victory ✌️
Updates ▶️ https://t.co/Z8UUziVx8d#ZIMvIND pic.twitter.com/L1wjxKeICu
— BCCI (@BCCI) July 25, 2026
प्रत्युत्तरात २२० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव भारतीय गोलंदाजीसमोर पत्त्यांसारखा कोसळला. संपूर्ण संघ १७.५ षटकांत अवघ्या १२९ धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेसाठी ब्रायन बेनेटने सर्वाधिक ३२ धावा केल्या, तर कर्णधार सिकंदर रझानसह (०) मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. भारताकडून अष्टपैलू अभिषेक शर्माने २.५ षटकांत १७ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.
तसेच या सामन्यात पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या, तर रवी बिश्नोई, शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांना १-१ यश मिळाले.





