India World Record : हरारेत इशान-तिलकचा धुमाकूळ! भारताने २१९ धावांचा डोंगर उभारत जागतिक विक्रमाची केली बरोबरी
India World Record : भारताने संघाने झिम्बाब्वेसमोर २१९ धावांचा डोंगर उभारत स्वतःच्याच एका वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करत इतिहास रचला आहे.

India World Record in T20I Cricket against Zimbabwe 2nd T20I Match : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५ गडी गमावून झिम्बाब्वेसमोर २१९ धावांचा डोंगर उभारला आहे. यासह भारतीय संघाने स्वतःच्याच एका वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करत इतिहास रचला आहे.
इशान किशन आणि तिलक वर्माचे वादळी अर्धशतक!
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचे २९ धावांवर दोन्ही सलामीवीर (वैभव सूर्यवंशी २०, अभिषेक शर्मा ८) बाद झाल्यानंतर इशान किशनने मैदानावर दमदार फलंदाजी केली. त्याने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने श्रेयस अय्यरसोबत ६६ आणि तिलक वर्मासोबत ९४ धावांची भागीदारी केली. दुसरीकडे, ११ व्या षटकात आलेल्या तिलक वर्माने अवघ्या २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत २९ चेंडूंत नाबाद ६० धावा कुटल्या.
शेवटच्या ३ षटकांत झिम्बाब्वेने केलं कमबॅक!
Innings Break!
Solid fifties from Ishan Kishan and Tilak Varma propel #TeamIndia to a strong total 🎯
Over to our bowlers to defend this 🙌
Scorecard ▶️ https://t.co/Z8UUziVx8d#ZIMvIND pic.twitter.com/1LM7Yv4qyF
— BCCI (@BCCI) July 25, 2026
भारतीय संघाने १७ षटकांत ३ बाद १८८ धावा केल्या होत्या आणि संघ २४० पार करेल असे वाटत होते. मात्र, झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी शेवटच्या ३ षटकांत अवघ्या ३१ धावा देत २ विकेट्स घेत जबरदस्त कमबॅक केले, ज्यामुळे भारतीय संघाला२१९ धावांवरच समाधान मानावे लागले.
टीम इंडियाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’!
या सामन्यात भारतीय संघाने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. एका कॅलेंडर वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ९ वेळा २०० हून अधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्याच नावावर होता. २०२४ मध्ये भारताने ९ वेळा ही कामगिरी केली होती. आता २०२६ या एकाच वर्षात भारताने ९ व्यांदा २००+ धावा करून स्वतःच्याच विक्रमाची बरोबरी केली आहे.





