विशाखापट्टणम – मीलन-22 या बहुराष्ट्रीय द्विवार्षिक नौदल सरावाचे उद्घाटन शनिवारी विशाखापट्टणम येथील नौदल प्रेक्षागृहात पार पडला. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह सहभागी देशांचे राजदूत, उच्चायुक्त, नौदल प्रमुख, प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख आणि या सरावात भाग घेणाऱ्या सर्व जहाजांचे कमांडिंग ऑफिसर्स आणि कर्मचारीवर्ग देखील यावेळी उपस्थित होता.
मीलन सरावाचे हे 11 वे वर्ष असून पूर्व नौदल कमांडतर्फे प्रथमच विशाखापट्टणमच्या सिटी ऑफ डेस्टिनी या बंदरात या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. यापूर्वी झालेला प्रत्येक सराव अंदमान-निकोबार कमांडच्या तिन्ही सेनादलांच्या नेतृत्वाखाली पोर्ट ब्लेयर येथे होत असे. या वेळच्या सरावात मित्रदेशांची 13 जहाजे, 39 प्रतिनिधी मंडळे आणि एक सागरी गस्त विमान सहभागी होत आहे.
या सरावाचा बंदराच्या ठिकाणचा टप्पा 28 फेब्रुवारी 2022 रोजी संपेल आणि त्यानंतर 1 मार्च 2022 ते 4 मार्च 2022 या काळात सरावाचा सागरातील टप्पा सुरू होईल.