Pro Kabaddi League 2024 (Dabang Delhi vs UP Yoddhas) :- प्रो कबड्डीच्या 11 व्या हंगामातील दबंग दिल्ली व युपी योद्धाज दरम्यानची लढत 32-32 अशी बरोबरीत राहिली. नवीन कुमारने शेवटच्या चढाईत(रेड) सामना बरोबरीत सोडवला.
9th tie of #PKL11, and the goosebumps keep coming 🤩🔥#ProKabaddi #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #DabangDelhiKC #UPYoddhas pic.twitter.com/c0FDt9zAJK
— ProKabaddi (@ProKabaddi) December 5, 2024
आतापर्यंत युपी योद्धाज संघाच्या 2 तर दबंग दिल्ली संघाच्या तब्बल 4 लढती अनिर्णित राहिल्या आहेत. पदकतालिकेमध्ये युपी योद्धाज तिसऱ्या तर दबंग दिल्ली चौथ्या स्थानी आहे. दबंग दिल्लीसाठी नवीन कुमारने 8 आणि आशू मलिकने 11 गुण घेतले. तर यूपीकडून योद्धा, गगन गौडाने 13 आणि भवानी राजपूतने 10 गुण घेतले.
गुरुवारी झालेल्या लढतीमध्ये मध्यंतराला दबंग दिल्ली संघाने 13-12 अशी एका गुणांची आघाडी घेतली होती. पहिल्या सत्रात युपी संघाने चढाईतून 10 तर पकडीतून 2 गुणांची कमाई केली. दबंग दिल्ली संघाने चढाईतून 9 तर पकडीतून 4 गुण मिळविले.
Pro Kabaddi League 2024 | अतितटीच्या लढतीत योद्धाजकडून टायटन्सला पराभवाचा धक्का….
लढतीत युपी संघाने 20 तर दिल्ली संघाने 19 यशस्वी चढाया केल्या. दिल्ली संघाच्या आशू मलिकने 11 तर नवीन कुमारने 08 गुणांची तर युपी संघाच्या गगन गोवडाने 13 तर भवानी राजपूतने 10 गुणांची कमाई केली.