Pro Kabaddi League 2024 (Telugu Titans vs UP Yoddhas) : – प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi 2024) च्या 91 व्या सामन्यात यूपी योद्धाज आणि तेलुगू टायटन्स आमने-सामने होते. या सामन्यात गगन गोवडाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर युपी योद्धाज संघाने तेलगू टायटन्स संघाला 36-33 असे केवळ 3 गुणांनी पराभूत करताना प्रो कबड्डी लीगच्या 11 हंगामातील आपली आगेकूच कायम राखली.
सातवें आसमान पर पहुंचा कबड्डी का रोमांच 🔥#UPYoddhas ने टाइटंस पर दर्ज की एक यादगार जीत 💪💙 #ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #TeluguTitans pic.twitter.com/f4HbRs6qGE
— ProKabaddi (@ProKabaddi) December 4, 2024
या विजयासह यूपी योद्धांनी गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून 48 गुणांसह ते 5व्या स्थानावर आले आहेत. तेलुगू टायटन्स 49 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.
येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या बुधवारच्या लढतीमध्ये युपी योद्धाजने मध्यंतराला 17-10 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. योद्धाज संघाने चढाईतून 24 तर पकडीतून 09 गुणांची कमाई केली. तेलगू टायटन्स संघाला चढाईतून 19 गुणांची तर पकडीतून 09 गुण मिळविता आले. युपी संघाने एकदा तर तेलगू टायटन्सने 02 वेळेस लोन चढविले. दोन्ही संघाकडून प्रत्येकी 01 सुपर रेड करण्यात आली.
Pro Kabaddi League 2024 | बेंगळुरू बुल्स-गुजरात जायंट्स लढत बरोबरीत…
गगन गोवडा आजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. गगनने चढाईतून 10 तर बोनसमधून 05 अशा एकूण 15 गुणांची कमाई केली. त्याला भवानी राजपूतने 06 गुण मिळविताना सुरेख साथ दिली. तेलगू संघाकडून विजयने 11 तर मनजीतने 07 गुण मिळविताना चांगली लढत दिली.