Pro Kabaddi 2024 (Match 131) | अखेरच्या सामन्यातही बेंगळुरू बुल्सच्या पदरी निराशा, यूपी योद्धाजनं केलं पराभूत…

Pro Kabaddi 2024 (Bengaluru Bulls vs UP Yoddhas) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 131 व्या सामन्यात मंगळवारी पहिला सामना बेंगळुरू बुल्स आणि यूपी योद्धाज यांच्यात पार पडला. हंगामातील शेवटच्या साखळी सामन्यात बेंगळुरू बुल्सला आपला शेवट गोड करता आला नाही. त्यांना यूपी योद्धाजने 44-30 असे पराभूत केले.
योद्धाज़ ने दिलचस्प मुक़ाबले में बुल्स पर दर्ज की धमाकेदार जीत 💥💙 #ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengaluruBulls #UPYoddhas pic.twitter.com/UWjp29yRIT
— ProKabaddi (@ProKabaddi) December 24, 2024
या सामन्यात यूपी योद्धाजकडून शिवम चौधरीने सर्वाधिक 13 गुण घेतले आणि कर्णधार सुरेंदर गिलने 9 गुण घेतले तर दुसरीकडे बेंगळुरू बुल्ससाठी सुशीलने 12 गुण घेतले आणि कर्णधार परदीप नरवालने 6 गुण घेतले. यादरम्यान परदीप नरवालने पीकेएलच्या इतिहासातील 1800 रेड पॉइंट्सही पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो प्रो कबड्डी लीगचा पहिला खेळाडू ठरला.
या सामन्यासाठी यूपी योद्धाजने आपला संपूर्ण संघ बदलला होता. याचे कारण ते आधीच प्लेऑफमध्ये पोहोचले होते आणि हा सामना त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता होता. त्यामुळे या सामन्यात सुरेंदर गिल, सचिन आणि केशव कुमार या खेळाडूंना संधी मिळाली होती.
अशाप्रकारे बेंगळुरू बुल्सचा हंगाम अत्यंत निराशेने संपला. त्यांना या मोसमात 22 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले आणि उर्वरित 18 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना संघासाठी बरोबरीत राहिला. बुल्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला.





