Pro Kabaddi 2024 (Match 129) | हरियाणानंतर दबंग दिल्लीची थेट उपांत्य फेरीत धडक, गुजरात जाएंट्सला केलं पराभूत…

Pro Kabaddi 2024 (Gujarat Giants vs Dabang Delhi KC) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील दुसरा उपांत्य फेरीचा संघ निश्चित झाला आहे. दबंग दिल्लीने गुजरात जायंट्सचा 45-31 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हरियाणा स्टीलर्स संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला होता आणि आता दबंग दिल्लीनेही उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे.
दिल्ली के दबंग छोरों ने जायंट्स को हराकर बनाया नया रिकॉर्ड 🔥
लगातार 15 मैचों में रहे अपराजित 💙#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #GujaratGiants #DabangDelhiKC pic.twitter.com/PO5rC4aJez
— ProKabaddi (@ProKabaddi) December 23, 2024
या सामन्यात कर्णधार आशु मलिकने पुन्हा एकदा दबंग दिल्लीसाठी जबरदस्त कामगिरी करत 14 गुण मिळवले. आशिषने डिफेंसमध्ये (बचाव) 4 गुण घेतले. या सामन्यात दबंग दिल्लीचा स्टार रेडर नवीन कुमारनेही PKL मधील 1100 रेड पॉइंट पूर्ण केले.
दुसरीकडे गुजरात जायंट्सकडून जितेंद्र यादवने डिफेंसमध्ये (बचाव) कहर केला आणि 7 गुण मिळवले. मात्र, त्याला इतर खेळाडूंची अजिबात साथ मिळाली नाही आणि त्यामुळे गुजरातला शेवटच्या साखळी सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले. दबंग दिल्लीला सलग 15 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला नाही, जो PKL मधील सर्वाधिक प्रदीर्घ सामना न हारण्याचा एक विक्रम प्रस्थापित झाला आहे.





