Pro Kabaddi 2024 (Match 121) | गुजरात जायंट्सचा लाजीरवाणा पराभव, यूपी योद्धाज 36 गुणांनी विजयी…

Pro Kabaddi 2024 (Gujarat Giants vs UP Yoddhas) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 121व्या सामन्यात यूपी योद्धाजने गुजरात जायंट्सचा 36 गुणांनी पराभव केला. यूपीने गुजरातचा 59-23 अशा फरकाने पराभव केला. या जबरदस्त विजयानंतर आणि सलग आठव्या सामन्यात अपराजित राहून यूपीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला असून थेट उपांत्य फेरीतही प्रवेश करू शकतो.
योद्धाज ने जायंट्स को दी करारी शिकस्त 💪🔥
लगातार आठवें मुक़ाबले में अपराजित रहते हुए प्वाइंट्स टेबल में दूसरे स्थान पर बनाई जगह 💙#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #GujaratGiants #UPYoddhas pic.twitter.com/v3XxcNcPnL
— ProKabaddi (@ProKabaddi) December 19, 2024
या सामन्यात गगन गौडाने यूपी योद्धासाठी चांगली कामगिरी करत 19 गुण मिळवले. भवानी राजपूतनेही त्याला चांगली साथ देत 11 गुण मिळवले. डिफेंसमध्ये हितेशने 3 गुण घेतले तर कर्णधार सुमितने 5 गुण घेतले.
दुसरीकडे, गुजरात जायंट्ससाठी कोणताही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही. केवळ कर्णधार गुमान सिंगने रेडिंगमध्ये (चढाई) 7 गुण घेतले.





