सोनई, (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील चांदा, लोहारवाडी व परिसरातून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस गौण खनिजाची ट्रॅक्टर व डंपरच्या सहाय्याने वाहतूक सुरू आहे.
भरलेले डंपर व ट्रॅक्टरमुळे परिसरातील रस्ते खराब होत आहेत.ट्रॅक्टर व डंपर चालकांना याबाबत विचारणा केली असता शेतीच्या लेव्हलिंग करता हा मुरुम वापरला जात आहे,असे सांगितले जाते.
रात्रंदिवस ट्रॅक्टर, डंपरच्या आवाजाने परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. रात्रंदिवस चालणाऱ्या डंपर, ट्रॅक्टर चालकावर कोण कारवाई करणार हा मोठा प्रश्न आहे. या गौण खनिजाच्या उत्खनाने परिसरामध्ये मोठ-मोठे खड्डे पडले आहे.
नेमका कोणाच्या परवानगीने हा प्रकार सुरू आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. याची चौकशी न झाल्यास ग्रामस्थातर्फे महसूलमंत्र्यांना निवेदन देऊन कारवाई करण्यासाठी साकडे घालणार आहे.