MI vs RCB सामन्यानंतर ‘या’ दोन खेळाडूंवर बीसीसीआयची कारवाई! नेमकं काय होतं कारण? जाणून घ्या
MI vs RCB : मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील रोमांचक सामन्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन खेळाडूंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांच्या एका खेळाडूचा समावेश आहे.

Tim David and Hardik Pandya Fine after MI vs RCB match : आयपीएल २०२६ चा थरार रंगत असतानाच आता शिस्तीच्या बाबतीतही बीसीसीआयने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील रोमांचक सामन्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन खेळाडूंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांच्या एका खेळाडूचा समावेश आहे.
कोणावर केली दंडात्मक कारवाई?
आरसीबीने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव करत या हंगामातील आपला तिसरा विजय नोंदवला. मात्र, या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच आरसीबीचा स्टार ऑलराउंडर टिम डेव्हिड याला शिस्तभंगाचा फटका बसला आहे. सामन्यादरम्यान पंचांच्या सूचनांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे टिम डेव्हिडच्या मॅच फीमधील २५ टक्के कपात करण्यात आली असून त्याच्या खात्यात एक ‘डिमेरिट पॉईंट’ देखील जोडला गेला आहे.
ಬಾಲ್ ಕೊಡು ಡೇವಿಡ್ ಅಣ್ಣ!😂
ವೀಕ್ಷಿಸಿ | #IPLRivalryWeek2026 👉 #MIvRCB | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ. #TATAIPL pic.twitter.com/y8t7AbdkK2
— Star Sports Kannada (@StarSportsKan) April 12, 2026
पंचांशी हुज्जत नडली?
Tim David fined 25% & handed a demerit point for breaching Article 2.4 (disobeying umpire instructions) 🚨
Hardik Pandya slapped with ₹12L fine for slow over-rate ⏳
.
.
.
.
📸: AP#Cricket #HardikPandya #TimDavid #MIvsRCB pic.twitter.com/hkn1rVW1f9— CREX (@Crex_live) April 13, 2026
टिम डेव्हिडवर आयपीएलच्या आचारसंहितेतील ‘लेव्हल-१’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. १८ व्या ओव्हरमध्ये पंचांनी चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला असता, डेव्हिडने तो चेंडू स्वतःकडेच ठेवला आणि पंचांना देण्यास उशीर केला. पुन्हा २० व्या ओव्हरमध्येही त्याने अशाच प्रकारे पंचांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. डेव्हिडने आपली चूक मान्य केली असून मॅच रेफरीने दिलेली शिक्षा स्वीकारली आहे.
हार्दिक पंड्याला १२ लाखांचा फटका –
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्यावर ‘स्लो ओव्हर रेट’साठी कारवाई करण्यात आली आहे. या हंगामातील ही मुंबईची पहिलीच चूक असल्याने हार्दिकला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सलग तिसऱ्या पराभवामुळे आधीच दबावात असलेल्या हार्दिकसाठी हा आर्थिक दंड म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरला आहे. शिस्तीच्या बाबतीत मिळालेली ही तंबी खेळाडूंना भविष्यात सावध राहण्याचे संकेत देणारी आहे.





