Pandya Brothers Enmity : पंड्या बंधूंमधील वैर चव्हाट्यावर? हार्दिकच्या विकेट्सनंतर क्रृणालचं आक्रमक सेलिब्रेशन अन् हस्तांदोलनही टाळलं
Pandya Brothers Enmity : हार्दिक आणि क्रृणाल यांच्यातील वागणुकीवरून आता सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Hardik Krunal Pandya Brothers Rivalry Video: आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीत रविवारी वानखेडे स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात आरसीबीने १८ धावांनी विजय मिळवला असला, तरी क्रिकेट वर्तुळात चर्चा मात्र मैदानावर आमनेसामने आलेल्या पंड्या बंधूंची रंगली आहे. हार्दिक आणि क्रृणाल यांच्यातील वागणुकीवरून आता सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
वानखेडेवर पार पडलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीने २४० धावांचा डोंगर उभा केला होता. मुंबईच्या डावादरम्यान जेव्हा हार्दिक पंड्या फलंदाजीला आला, तेव्हा त्याचा मोठा भाऊ क्रृणाल पंड्या गोलंदाजी करत होता. नेहमी एकमेकांशी थट्टा-मस्करी करणाऱ्या या भावांमध्ये काल मात्र कमालीचा तणाव पाहायला मिळाला. क्रृणालने हार्दिकचे स्वागत चक्क एका भेदक बाऊन्सरने केले, ज्यावर हार्दिकने कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहणे पसंत केले.
BROTHER vs BROTHER 😭💔
– Krunal Pandya fires a bouncer at Hardik Pandya… Hardik looks disappointed, Krunal walks in staring him down.
– Hardik gets caught out… and Krunal shows some unnecessary aggression 👀🔥
Hardik’s stare says it all.Something is definitely NOT right… pic.twitter.com/Vi2sfcvauz
— Just In (@CricketPlus0) April 13, 2026
हार्दिक बाद झाल्यावर क्रृणालचा जल्लोष –
Brother vs Brother, RCB vs Mi, Krunal Pandya Celebration. #krunalpandya #hardikpandya #ipl #rcbvsmi pic.twitter.com/0ICXNDOtMl
— Chandra prakash Yadav (@Gorakhpur_0_km) April 13, 2026
या सामन्यातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा आरसीबीच्या जेकब डफीने हार्दिकला बाद केले, तेव्हा क्रृणाल पंड्याने अत्यंत आक्रमकपणे जल्लोष केला. सख्खा भाऊ बाद झाल्यावर क्रृणालने दाखवलेली ही आक्रमकता पाहून फॅन्सही चकित झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, अनेकांनी याला दोघांमधील दुराव्याचे संकेत मानले आहे.
सामना संपल्यावर हस्तांदोलनही टाळले!
Krunal Pandya didn’t went to shake hand with hardik Pandya.
Is everything normal between them??#hardikpandya #MIvRCB pic.twitter.com/WhxPKEwcZP— impact player (@whypratik) April 12, 2026
विशेष म्हणजे सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात, परंतु हार्दिक आणि क्रृणाल यांनी एकमेकांना भेटणे स्पष्टपणे टाळले. गेल्या महिन्यात भारताने टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही क्रृणालने हार्दिकबद्दल कोणतीही विशेष पोस्ट किंवा प्रतिक्रिया दिली नव्हती, तेव्हापासूनच या वादाच्या चर्चा सुरू होत्या. कालच्या सामन्यानंतर या चर्चांना आता अधिक बळ मिळाले आहे.





