Mohammed Siraj : ICCच्या ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर! सिराजसह ‘या’ तीन खेळाडूंमध्ये टक्कर

सिराजची इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी –
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला इंग्लंड दौऱ्यावरील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील अप्रतिम गोलंदाजीमुळे नामांकन मिळाले आहे. सिराजने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 23 विकेट्स घेतल्या. त्याने एकूण 185.3 षटके टाकली आणि मालिका 2-2 ने बरोबरीत राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Three exciting pacers are in the running for the ICC Men’s Player of the Month award for August 2025 🤩
— ICC (@ICC) September 8, 2025
आयसीसीने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, सिराजने ऑगस्टमध्ये केवळ एक सामना खेळला, परंतु ‘द ओव्हल’ येथील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या अंतिम कसोटी सामन्यात त्याने 21.11 च्या सरासरीने 9 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात त्याने 4, तर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातील त्याच्या निर्णायक गोलंदाजीमुळे भारताने सामना जिंकला आणि मालिका बरोबरीत राखली. या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सिराजला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा – Asia Cup 2025 : दम असेल तर एक तरी षटकार मारून दाखवा…! पाकिस्तानच्या फलंदाजांपुढे जसप्रीत बुमराहचे चॅलेंज
मॅट हेन्रीचे झिम्बाब्वे दौऱ्यावर दिसले वर्चस्व –
Three pacers are shortlisted for the ICC Men’s Player of the Month for August 2025 🏆#ICC #POTM #MohammedSiraj #MattHenry #JaydenSeales #CricketTwitter pic.twitter.com/gdniLMmBr6
— InsideSport (@InsideSportIND) September 8, 2025
न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेन्रीला झिम्बाब्वे दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील शानदार कामगिरीसाठी नामांकन मिळाले आहे. हेन्रीने या मालिकेत 16 विकेट्स घेतल्या. पहिल्या कसोटीत त्याने 39 धावांत 6 आणि 51 धावांत 3 विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या कसोटीत 40 धावांत 5 आणि 16 धावांत 2 विकेट्स घेत न्यूझीलंडला 2-0 ने मालिका जिंकून दिली.
हेही वाचा – Asia Cup 2025 : आशिया कपसाठी कॉमेंट्री पॅनेलची घोषणा, शास्त्री-गावस्करांसह ‘या’ दिग्गजांना मिळाले स्थान
जेडन सील्सने रचला इतिहास –
वेस्ट इंडिजचा जेडन सील्सने एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानविरुद्ध 34 वर्षांनंतर वेस्ट इंडिजला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सील्सने तीन सामन्यांच्या मालिकेत 10 विकेट्स घेतल्या. विशेषतः अंतिम सामन्यात त्याने 18 धावांत 6 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे पाकिस्तानचा डाव 295 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 92 धावांत संपुष्टात आला. या तीन खेळाडूंनी आपापल्या मालिकांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आयसीसीच्या ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.





