Asia Cup 2025 : आशिया कपसाठी कॉमेंट्री पॅनेलची घोषणा, शास्त्री-गावस्करांसह ‘या’ दिग्गजांना मिळाले स्थान

Asia Cup 2025 Sony Sports Network Commentary Panel : आशिया कपच्या 17व्या हंगामाला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या टी-20 स्पर्धेसाठी सर्व आठ संघांनी कंबर कसली आहे. यासोबतच प्रसारकांनी त्यांच्या कॉमेंट्री पॅनेलची घोषणाही केली आहे. यंदा भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर, रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग आणि माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचा समावेश कॉमेंट्री पॅनेलमध्ये आहे.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्क करणार थेट प्रक्षेपण –
सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणार आहे. जागतिक फीडसाठी निवडलेल्या कॉमेंटेटरांमध्ये रवी शास्त्री, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, रॉबिन उथप्पा, बाझिद खान, वकार युनूस, वसीम अक्रम, रसेल अर्नॉल्ड आणि सायमन डूल यांचा समावेश आहे.
हिंदी कॉमेंट्रीसाठी दिग्गजांची फौज सज्ज –
𝑨𝒔𝒊𝒂 𝑪𝒖𝒑 𝒌𝒆 𝒉𝒂𝒓 𝒑𝒂𝒍 𝒌𝒐 𝒃𝒂𝒏𝒂𝒚𝒆𝒏𝒈𝒆 𝒚𝒂𝒂𝒅𝒈𝒂𝒂𝒓 😍
Introducing the Hindi commentary panel for the #ACCMensAsiaCup2025🎙️#SonySportsNetwork pic.twitter.com/BgX2QPk4wG
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 6, 2025
हिंदी कॉमेंट्री पॅनेलमध्ये वीरेंद्र सेहवाग, इरफान पठान, अजय जडेजा, माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर आणि सबा करीम यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असतील. तमिळ पॅनेलमध्ये भरत अरुण यांच्यासोबत डब्ल्यूव्ही रमन यांचा समावेश आहे, तर तेलुगु पॅनेलमध्ये वेंकटपति राजू आणि वेणुगोपाल राव यांच्यासारखे माजी खेळाडू दिसतील.
हेही वाचा – Asia Cup 2025 : दम असेल तर एक तरी षटकार मारून दाखवा…! पाकिस्तानच्या फलंदाजांपुढे जसप्रीत बुमराहचे चॅलेंज
सोनी नेटवर्क आणि गावस्कर यांचे मत –
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कचे मुख्य महसूल अधिकारी राजेश कौल यांनी सांगितले की, आशिया कपच्या पुनरागमनासह सोनी स्पोर्ट्स नेटवर्क क्रिकेट प्रसारणाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे. सुनील गावस्कर यांनी सोनीच्या निवेदनात म्हटले की, सूर्यकुमार यादवच्या डायनॅमिक नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कपच्या व्यासपीठावर उतरणार आहे. ही संघटना अनुभव आणि उत्साहाचा उत्कृष्ट संगम दाखवणारी, बहुमुखी आणि लढाऊ आहे, जी भारतीय क्रिकेटच्या भविष्याचे प्रतीक आहे.
हेही वाचा – US Open 2025 : यूएस ओपन जिंकताच कार्लोस अल्काराझवर कोट्यवधींचा पाऊस, उपविजेता सिनरही झाला मालामाल
स्पर्धेचे स्वरूप आणि संघ –
या 17व्या हंगामात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगानिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग हे आठ संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघ पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी आशियातील नंबर-1 संघ बनण्यासाठी झुंजणार आहेत. भारत आपला पहिला सामना बुधवारी यूएईविरुद्ध खेळणार आहे.





