मुंबई– बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी अभिनेता विकी कौशलसोबत अनेक ठिकाणी जाऊन ती चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यासाठी अनेकदा तिने धार्मिक स्थळांना भेट दिल्याचेही पाहायला मिळाले. अलिकडेच तिने उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मात्र यावरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. यावर आता साराने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
एका मुलाखतीत तिने सांगितले की, “मी माझं काम खूप गांभीर्याने करत आहे. मी लोकांसाठी काम करते, तुमच्यासाठी करते. जर तुम्हाला माझे काम आवडले नाही तर मला कदाचित वाईट वाटेल, पण माझी वैयक्तिक श्रद्धा आहे. मी त्याच भक्तीने अजमेर शरीफला जाईन ज्या श्रद्धेने मी बांगला साहेब गुरुद्वारा किंवा महाकालला जाते. लोकांना जे बोलायचे ते बोलू द्या, मला त्याने फरक पडत नाही. मी अशा ठिकाणी जात राहील. तुम्हाला त्या जागेची ऊर्जा आवडणे गरजेचे असते आणि मला त्या ऊर्जेवर विश्वास आहे.”
बुधवारी महाकालेश्वर मंदिरात जाऊन सारा आणि विकीने शिवलिंगाची पूजा केली होती. याचे फोटो तिने इनस्टाग्रामवर शेअर केले होते. दरम्यान, सारा अनेकदा मंदिरामध्ये गेली आहे. मात्र यावरून तिला सतत ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वी तिने राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली होती. येथील काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
#WATCH | Indore, Madhya Pradesh | When asked about internet trolling after her visit to Mahakal Temple in Ujjain, actress Sara Ali Khan says, “…I take my work very seriously. I work for people, for you. I would feel bad if you don’t like my work but my personal beliefs are my… pic.twitter.com/ffXdurUCDY
— ANI (@ANI) May 31, 2023
सारासह ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात विकी कौशलही मुख्य भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट 2 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.