Ajit Pawar : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुतांशी ठिकाणी निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराची मोहिम सर्वत्र मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उमेदवारांच्या प्रचार संभांना स्वतः हजेरी लावत आहेत. प्रचार सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन अजित पवार करत आहेत. काल त्यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील सभा घेतल्यानंतर फुरसुंगी देवाची उरळी येथे आयोजित केलेल्या सभेत अजित पवार पोहचले. या सभेतून त्यांनी केलेल्या वक्व्याची जोरदार चर्चा होत आहे. फुरसुंगी, उरुळी देवाची भागात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. तुमच्या भागातले काय रस्ते आहेत. खरंच सॅल्यूट तुम्हाला…कसं सहन करता तुम्ही हा त्रास? रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री म्हणून मला लाज वाटली, असे वक्तव्य अजित पवार यांनी भरसभेतून केले आहे. उरुळी देवाची फाटा ते उरुळी गाव रोड दरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माता-भगिनींनी माझ्यावर केलेला प्रेमाचा वर्षाव, दाखवलेला विश्वास, दिलेले आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे..! 📍फुरसुंगी pic.twitter.com/KaHtZDwv8h — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 27, 2025 फुरसुंगी नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १६ प्रभागातून ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगाणात उतरले आहेत. तर नगराध्यक्ष पद हे मागासवर्गी प्रवर्गासाठी राखीव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संतोष सरोदे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून देखील उमेदवार रिंगाणात आहेत. राष्ट्रवादी- शिवसेना आमने सामने आले आहेत. राज्यात सत्तेत असणारे हे दोन्ही पक्ष स्थानिक निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उतरले आहेत. अप्रत्यक्ष विजय शिवतारेंना टोला या प्रचार सभेतून अजित पवार यांनी फुरसुंगी उरूळी देवाची पुणे मनपात समाविष्ट केली होती, या गावांचा विकास होईल. असा उद्देश त्यामागे होता; पण मध्यंतरी इथं पुन्हा नगरपरिषद मंजूर झाली आणि आज ही निवडणूक लागली. पण गावची परिस्थिती काय? असा सवाल उपस्थित करत रस्ते प्रचंड खराब आहेत. उरूळी देवाची गावचा रस्ता एवढा खराब झालाय की सांगायची लाज वाटते. पण काही लोकांनी टँक्सचं कारण देऊन इथं नगरपरिषद आणली आणि तेव्हा आश्वासन दिलं की 300 कोटी आणतो. मला सांगा आले का? नाही ना, असा टोला अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना अप्रत्यक्ष लगावला. मला आता महाराष्ट्र घडवायचाय : अजित पवार मी शब्दाचा पक्का आहे. या नगरपरिषदेला मी निधी मिळवून देणारच, असा शब्द अजित पवारांनी यावेळी बोलताना दिला. होय, माझ्यात धमक हे म्हणूनच बारामतीचा विकास करून दाखवला आहे. मला आता महाराष्ट्र घडवायचाय, म्हणून तुमची साथ हवी आहे, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी बोलताना केले. हेही वाचा : पाकिस्तानमध्ये मध्यरात्री ड्रामा ; इम्रान खानचा मुलगा म्हणाला, “माझे वडील जिवंत आहेत याचा…”