Imran Khan Dead। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या कुटुंबाला आणि पीटीआयच्या कोणत्याही नेत्याला त्यांना भेटण्याची परवानगी नाही. दरम्यान, याच कारणावरून पाकिस्तानच्या आदियाला तुरुंगाबाहेर रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. दरम्यान, इम्रान खान यांचे पुत्र कासिम खान यांनी केलेल्या पोस्टमुळे या प्रकरणात तणाव निर्माण झाला आहे. इम्रान खान यांचे पुत्र कासिम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करताच देशातील अनेक भागात अस्वस्थता पसरली. ब्रिटनमध्ये राहणारे कासिम खान यांनी आपल्या पोस्टमध्ये,” इम्रान खान यांना गेल्या सहा आठवड्यांपासून अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांना कोणाशीही संपर्क साधण्याची परवानगी नाही. याविषयी त्यांच्या कुटुंबाला माहिती दिली जात नाही.” असे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी “आपले वडील जिवंत असल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही.” असे म्हटले आहे. त्याच्या या विधानामुळे देशात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. कासिम आणि त्यांचा भाऊ राजकारणापासून दूर राहतात, परंतु यावेळी परिस्थितीमुळे त्यांना उघडपणे समोर येण्यास भाग पाडले. इमरान खान यांना लपवण्याचा प्रयत्न Imran Khan Dead। कासिम यांनी आपल्या पोस्टमध्ये ,”परिस्थिती सुरक्षेचा उपाय नाही तर त्याच्या वडिलांना वेगळे करण्यासाठी एक जाणीवपूर्वक केलेली योजना आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही, त्याच्या बहिणींना अनेक वेळा तुरुंगात प्रवेश नाकारण्यात आला आहे. वकिलांनाही तुरुंगात प्रवेश नाकारण्यात आला आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.” असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानची जबाबदारी इम्रान खानची सुरक्षा सुनिश्चित कासिमने संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि जगभरातील लोकशाही सरकारांना इम्रान खानची खरी स्थिती उघड करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. “जर इम्रान खान यांच्या सोबत काही अनुचित घडले तर त्याला पाकिस्तान सरकार थेट जबाबदार असेल” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे नाट्य Imran Khan Dead। मध्यरात्री पाकिस्तानातील रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगाबाहेर हाय-व्होल्टेज ड्रामा घडला. खैबर पख्तूनख्वा प्रांताचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी काल संध्याकाळपासून अदियाला तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत. इम्रान खानला भेटण्याची मागणी करत आहेत. हे. सरकार आणि तुरुंग प्रशासनाकडून स्पष्टीकरण दरम्यान , या सगळ्या प्रकरणावर सरकारची भूमिका पूर्णपणे उलट आहे. तुरुंग प्रशासनाने जाहीर केले की इम्रान खान यांना त्रास दिला जात नाही. त्यांच्या मते, इम्रान यांना तुरुंगात अशा सुविधा मिळत आहेत ज्या कोणत्याही सामान्य कैद्याला मिळत नाहीत. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी असेही सांगितले की इम्रान यांना विशेष जेवण, जिम सुविधा आणि आरामदायी निवास व्यवस्था देण्यात आली आहे. पीटीआय दबाव दीर्घकाळ चाललेल्या तणावानंतर, तुरुंग प्रशासनाने आश्वासन दिले की, इम्रान खानची बहीण अलिमा खान आणि कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल. यानंतर, निदर्शने काहीशी शांत झाली आणि सर्वांचे लक्ष आता या भेटीवर केंद्रित झाले आहे.