Hottest Place In The World : ‘ही’ आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, जाणून घ्या येथील तापमान….

Hottest Place In The World : पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण म्हणजे डेथ व्हॅली, कॅलिफोर्निया, जिथे तापमान ५०°C (१२२°F) पेक्षा जास्त असते. पण जेव्हा आपण सर्वात उष्ण देशांबद्दल बोलतो तेव्हा ते फक्त एकाच ठिकाणाच्या स्थितीवरून सिद्ध होणार नाही. म्हणूनच, आपल्याला संपूर्ण देशाच्या सरासरी तापमानाशी संबंधित इतर गोष्टींकडे देखील लक्ष द्यावे लागेल.
माली, बुर्किना फासो आणि सेनेगल हे तीन सर्वात उष्ण देश आहेत. या देशांमध्ये तीव्र उष्णता जाणवते, विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत, जिथे तापमान नियमितपणे ४५°C (११३°F) पेक्षा जास्त असते. आज आपण जगातील सर्वात उष्ण १० देशांवर नजर टाकूयात…
जगातील सर्वात उष्ण देशांची यादी :
१. माली – २८.३ सरासरी वार्षिक तापमान (°C)
२. बुर्किना फासो – २८.३
३. किरिबाटी – २८.२
४. जिबूती – २८
५. तुवालू – २८
६. सेनेगल – २७.९
७. मॉरिटानिया – २७.७
८. मालदीव – २७.६
९. पलाऊ – २७.६
१०. बेनिन – २७.६
८४. भारत- २३.७
दरम्यान, या देशांमध्ये सर्वाधिक उष्ण तापमान असते. अशा ठिकाणी सामान्य माणसाला राहणे अवघड आहे. या ठिकाणी असलेली उष्णता कोणालाही आजारी पाडण्यासाठी पुरेशी आहे. या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो.





