Honor ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Honor 90 5G लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन आपल्या भारतीय भागीदार HTech च्या सहकार्याने सादर केला आहे. फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा, 50 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, 6.7 इंच क्वाड-वक्र फ्लोटिंग डिस्प्ले यासारखी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. Honor 90 5G मध्ये Qualcomm चा Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर आहे. 8 आणि 12 GB RAM च्या सपोर्ट आहे..
Honor 90 5G किंमत –
हा स्मार्टफोन एमराल्ड ग्रीन, डायमंड सिल्व्हर आणि मिडनाईट ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. Honor 90 5G च्या 8 + 256 GB व्हेरिएंटची भारतात किंमत 37,999 रुपये आहे. त्याच्या 12+512 GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे की काही सुरुवातीचे वापरकर्ते हा फोन अनुक्रमे 27,999 रुपये आणि 29,999 रुपयांना अर्ली बर्ड किंमतीत खरेदी करू शकतील.
Honor 90 5G चा पहिला सेल Amazon वर 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता होईल. ई-कॉमर्स साइट 2,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट देखील देत आहे. खरेदी दरम्यान, ICICI आणि SBI कार्ड वापरकर्त्यांना 3,000 रुपयांची अतिरिक्त झटपट सूट मिळू शकेल. आवश्यक असल्यास, हँडसेट 30 दिवसांच्या आत एक्सचेंज देखील केला जाऊ शकतो.
Honor 90 5G ची प्रमुख वैशिष्ट्ये –
Honor 90 5G मध्ये 6.7-इंचाचा क्वाड-वक्र फ्लोटिंग डिस्प्ले आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हे एक AMOLED पॅनेल आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2664×1200 पिक्सेल आहे. फोनची पीक HDR ब्राइटनेस 1600 nits आहे. हा डिस्प्ले नेटफ्लिक्ससाठी HDR 10 Plus प्रमाणित आणि HDR प्रमाणित आहे. या फोनमध्ये 3840Hz PWM dimming तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे डोळ्यांना कोणताही धोका होत नाही.
Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर
Honor 90 5G हा वजनाने हलका स्मार्टफोन आहे. याचे वजन केवळ 183 ग्रॅम आहे. त्याच्या मागच्या बाजूला दोन वेगळे रिंगसारखे कॅमेरा बंप आहेत, ज्याच्या आत मागील कॅमेरे बसवले आहेत. Honor 90 5G मध्ये Qualcomm चा Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर आहे. यात 8 GB आणि 12 GB LPDDR5 रॅमसाठी समर्थन आहे. अंतर्गत स्टोरेज 512 GB पर्यंत आहे.
ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
Honor 90 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सेलचा आहे. त्याशिवाय 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो कॅमेरा आणि डेप्थ कॅमेरा आहे. 200 MP मुख्य मागील कॅमेरामध्ये 1/1.4 इंच सेन्सर आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
3 वर्षांचे सिक्युरिटी पॅच अपडेट
Honor 90 5G च्या बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध नाही. Honor म्हणते की ते भारतीय वापरकर्त्यांना स्वतंत्र 30W चार्जर प्रदान करेल. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Magic OS 7.1 वर चालतो. 5G कनेक्टिव्हिटी व्यतिरिक्त इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये NFC सपोर्ट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि UFS 3.1 ही वैशिष्ट्ये आहेत. कंपनी 2 वर्षांचे सॉफ्टवेअर आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी पॅच अपडेट देत आहे.