Accident News : हिमाचल प्रदेशमध्ये एक हृदयद्रावक अपघात घडला असून धावत्या कारवर मोठं झाड कोसळल्याने ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुल्ली जिल्हामध्ये शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. (Accident News) मिळालेल्या माहितीनुसार, शमशेर-गुगरा मार्गावरून प्रवास करत असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड उन्मळून कारवर कोसळले. झाडाच्या जबरदस्त आघातामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. (Accident News) या कारमधून एकूण ७ जण प्रवास करत होते. त्यापैकी ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. (Accident News) मृत शिक्षिकांची नावे स्नेह लता, बंटी कौंडल, उषा कुमारी आणि सीमा आझाद अशी असून त्या शाळा सुटल्यानंतर घरी परतत होत्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Accident News) दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत प्रशासनाकडे मदत व नुकसानभरपाईची मागणी केली आहे. पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. (Accident News)