Car Accident : महाराष्ट्रातील आणखी एका खासदाराच्या कारचा अपघाता झाल्याची घटना घडली आहे. भाजप खासदार हेमंत विष्णू सावरा यांच्या कारचा घोडबंदर रोडवर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव डंपरने समोरून जोरदार धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (Car Accident) सुदैवाने डॉ. हेमंत विष्णू सावरा हे या अपघातातून थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र कार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांची गाडी मुंबईहून गुजरातकडे जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. (Car Accident) दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बजरंग सोनवणे यांच्या कारलाही अपघात झाला होता. त्यांच्या वाहनाला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिल्याने गाडीचे नुकसान झाले होते. या सलग घटनांमुळे राज्यातील खासदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Car Accident) घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. डंपर चालकाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Car Accident)