BJP MLA Car Accident : भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात ; ताफ्यातील गाडीची इतर वाहनांना धडक
BJP MLA Car Accident : मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवर भाजपचे विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला.

BJP MLA Car Accident : मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवर भाजपचे विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला.
सायनच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ताफ्यातील गाडीने एका टॅक्सी आणि दोन कारला धडक दिल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातात आमदार प्रवीण दरेकर यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुरक्षित आहेत. मात्र, धडकेत संबंधित वाहनांचे नुकसान झाले. अपघातामुळे ईस्टर्न फ्री वेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने किंवा अचानक समोर वाहन आल्याने अपघात झाल्याचा संशय आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.






