नवी दिल्ली – दिल्लीतील जेएनयू प्रशासनाला हायकोर्टाने चांगलाच दणका दिला असून त्या विद्यापीठाच्या नऊ विभाग व केंद्र प्रमुखांना कोणताही मोठा निर्णय घेण्यास मज्जाव केला आहे.
या केंद्र प्रमुखांच्या कुलगुरूंनी केलेल्या नियुक्त्या सकृत दर्शनी बेकायदेशीर आहेत, असा ठपकाही दिल्ली हायकोर्टाने ठेवला आहे. या नियुक्त्या कुलगुरूंनी केल्या असल्या तरी त्यांना तो अधिकारच नाही, असे कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले आहे.
या नियुक्त्यांचा अधिकार विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाला आहे. त्यामुळे या नियुक्त्या बेकायदेशीर ठरतात असे सकृत दर्शनी स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे या विषयीचा अंतिम निर्णय होईपर्यंत या केंद्र व विभाग प्रमुखांना त्यांच्या विभागाअंतर्गत कोणत्याही नियुक्त्या करता येणार नाहीत, किंवा नियुक्त्यांसाठी समित्याही नियुक्त करता येणार नाहीत, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.