Monsoon Update : राज्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी; धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
Monsoon Update : महाराष्ट्रभरात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला असून, नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Monsoon Update : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा दमदार हजेरी लावली. आहे. राज्यभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon Update)
दुसरीकडे, गुजरात राज्यातही पावसाने हाहाकार उडाविला आहे. तिथे पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील ३५ पर्यटकांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पश्चिम भारतापासून ते दक्षिण कोरियापर्यंत तब्बल १० हजार किलोमीटर लांबीचे ढग पसरले असून या क्लाऊड कॉरिडॉरमुळेच हा जोरदार पाऊस होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (Monsoon Update)
जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलैमध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट तर नाशिक, ठाणे, पालघर, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Monsoon Update)
Monsoon Update : मान्सून पुन्हा होतोय सक्रिय; महाराष्ट्रासह मध्य भारतात ढगांची गर्दी वाढू लागली
सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे, २३ जुलैपर्यंत महाराष्ट्रात महिन्याच्या सरासरीपेक्षा ३४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. (Monsoon Update)
गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव येथे अवघ्या २४ तासांत तब्बल १०६४ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली असून, त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या तलासरी, डहाणू आणि पालघर भागावरही झाला आहे. (Monsoon Update)
ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आवश्यक ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. (Monsoon Update)
Monsoon Update : वरुणराजाची विश्रांती! राज्यात 16 टक्के पावसाची तूट; २१ जुलैनंतर पुनरागमनाचा अंदाज






