Monsoon Update : वरुणराजाची विश्रांती! राज्यात 16 टक्के पावसाची तूट; २१ जुलैनंतर पुनरागमनाचा अंदाज
Monsoon Update : जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसानंतर गेल्या काही दिवसांत पावसाचा वेग कमी झाला आहे.

Monsoon Update : जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसानंतर गेल्या काही दिवसांत पावसाचा वेग कमी झाला आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी तुरळक सरी होत असल्या तरी सर्वदूर पावसाची सक्रियता कमी झाल्याचे चित्र आहे. (Monsoon Update)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 9 जुलैनंतर मध्य भारतासह महाराष्ट्रातील पावसाच्या हालचालीत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यंदाच्या मान्सूनमध्ये सुरुवातीच्या काळात पावसाची कमतरता दिसून आली. (Monsoon Update)
काही दिवस चांगला पाऊस झाल्यानंतरही देशातील एकूण पावसाची तूट पुन्हा वाढून सुमारे 18 टक्क्यांवर पोहोचल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात 16 टक्के तूटची नोंद करण्यात आली आहे. (Monsoon Update)
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सध्या सुरू असलेला कोरडा टप्पा काही दिवस टिकू शकतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता तातडीने दिसत नसली तरी २१ जुलैनंतर पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत मध्यम ते जोरदार सरी परत सुरू होऊ शकतात. (Monsoon Update)
विदर्भातील 11 जिल्ह्यांपैकी केवळ गोंदिया हा एकमेव जिल्हा ठरला आहे, जिथे सरासरीपेक्षा 16 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. गोंदियात आतापर्यंत 407.५ मिमी पाऊस झाला आहे, तर तिथे सरासरी 352 मिमी पाऊस अपेक्षित होता. गोंदिया वगळता इतर सर्व 10 जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची तुट पाहायला मिळत आहे. (Monsoon Update)
जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पेरण्यांना वेग आला. मात्र पुढील काही दिवसांचा खंड कोरडवाहू भागांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. पावसाचे पुनरागमन वेळेवर झाले तर खरीप पिकांना फायदा होईल, अन्यथा काही भागांत ओलावा टिकवण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते. (Monsoon Update)
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची ही मोठी तूट कायम असल्याने खरीप पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेरण्या उलटून गेल्यानंतर आता शेतकरी राजा पुढील काही दिवसांतील मान्सूनच्या सक्रियतेकडे डोळे लावून बसला आहे. (Monsoon Update)
Heavy Rain : अतिवृष्टीमुळे शेतशिवार जलमय; भातरोपे कुजण्याच्या मार्गावर






