नागपुरात भीषण अपघात! भरधाव कंटेनरच्या धडकेत पती-पत्नीसह ४ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
Nagpur Accident News : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा मार्गावर गवासी मानपूरजवळ शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला.

Nagpur Accident News : नागपूर जिल्ह्यात एका कंटेनर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर दुसरे मूल गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा मार्गावरील गवासी मानपूरजवळ घडली. मृतांची ओळख योगेश नाईक (३५), सुनीता योगेश नाईक आणि गुलशन ऊर्फ गोलू योगेश नाईक (४) अशी पटली आहे. (Nagpur Accident News)
पोलिसांच्या माहितीनुसार, हे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या कंटेनर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील चौघेही जण रस्त्यावर फेकले गेले. (Nagpur Accident News)
या अपघातात पती-पत्नी आणि त्यांच्या एका मुलाला गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहा वर्षांचा दुसरा मुलगा जखमी अवस्थेत बचावला असून, त्याला उपचारासाठी तातडीने खापरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. कंटेनर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. (Nagpur Accident News)
Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! कंटेनरच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू





