Monsoon Update : मान्सून पुन्हा होतोय सक्रिय; महाराष्ट्रासह मध्य भारतात ढगांची गर्दी वाढू लागली
Monsoon Update : गेल्या दोन आठवड्यांपासून देशभरात मान्सूनची प्रगती मंदावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या संकटात आल्या होत्या आणि पावसाची तूटही सातत्याने वाढत होती.

Monsoon Update : देशभरातील अनेक राज्यांमध्ये दोन आठवड्यांपासून मान्सूनची प्रगती मंदावली होती आणि खरिपाचा हंगाम असतानाच पावसाची तूट वाढत चालली होती. मात्र, आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण आता मान्सूनचा पाऊस घेऊन येणारे ढग तयार होऊ लागले आहेत. (Monsoon Update)
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजांनुसार, मध्य भारतात पाऊस घेऊन येणारे ढग हळूहळू पुन्हा जोर धरतील. त्यामुळे सर्वदूर मान्सूनचा पाऊस पडण्याची प्रतीक्षा करणा-या महाराष्ट्रासह सर्वच राज्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Monsoon Update)
सुरुवातीच्या जोरदार आगमनानंतर रेंगाळलेला मान्सून आता पुन्हा एकदा सर्वदूर सक्रिय होत असल्याचे या अंदाजावरून दिसून येते. उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक भागांत अजूनही मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू झालेला नसला, तरी वाढती ढगांची गर्दी आणि वादळाची स्थिती पाहता, आगामी दिवसांत मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल होत असल्याचे स्पष्ट होत आहे. (Monsoon Update)
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९ जून ते २५ जून दरम्यान छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Monsoon Update)






