Harshvardhan Sadgir Retirement : कुस्ती विश्वात खळबळ! हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीची गदा उंचावताच कुस्तीला ठोकला रामराम
Harshvardhan Sadgir Retirement : ६८ व्या महाराष्ट्र केसरी (२०२६) कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल जेवढा थरारक होता, त्यापेक्षाही धक्कादायक ठरली ती विजेत्या मल्लाची घोषणा

Harshvardhan Sadgir Retirement after Maharashtra Kesari 2026 win : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रविवारी रात्री उशिरा नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरच्या विजयाने संपला. हर्षवर्धनने सोलापूरच्या ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाडचा ४-३ अशा अटीतटीच्या फरकाने पराभव करत ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान मिळवला. मात्र, विजयाचा गुलाल उधळला जात असतानाच हर्षवर्धनने कुस्तीतून निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच अवाक केले.
मैदानावरील अटीतटीचा संघर्ष –
कुस्तीच्या सुरुवातीला महेंद्र गायकवाडने आक्रमक पवित्रा घेतला होता. महेंद्रने हर्षवर्धनला बाहेर ढकलत १ गुण मिळवला. त्यानंतर महेंद्रला ताकीद देऊनही नियमानुसार खेळ न केल्याने हर्षवर्धनला १ गुण मिळाला आणि पहिल्या ३ मिनिटांनंतर सामना १-१ असा बरोबरीत होता. दुसऱ्या फेरीत महेंद्रला ‘अॅक्टिव्हिटी पिरियड’ देण्यात आला, मात्र त्यात गुण न मिळाल्याने हर्षवर्धनला पुन्हा १ गुण मिळाला. अनुभवी हर्षवर्धनने आपली पकड मजबूत करत ४ गुणांची आघाडी घेतली. शेवटच्या क्षणी महेंद्रने १ गुण मिळवला, पण तोपर्यंत हर्षवर्धनने ४-३ ने विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
चांदीची गदा अन् निवृत्तीचा धमाका!
‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरलेल्या हर्षवर्धन सदगीर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!#MaharashtraKesari#HarshvardhanSadgir#Wrestling#ProudMoment#NashikSpeaks
Harshvardhan Sadgir Maharashtra Kesari 2026, double Maharashtra Kesari winner, Maharashtra Kesari wrestling news pic.twitter.com/py2q0PSPN5
— nashik speaks (@nashik_speaks_) March 22, 2026
कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते चांदीची गदा आणि पुरस्कार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धनने उपस्थितांना धक्का दिला. गदा खांद्यावर घेऊन अवघ्या १२ मिनिटांतच त्याने “मी गादी विभागाच्या कुस्तीतून निवृत्त होत आहे”, अशी घोषणा केली.
“सरकारने मला नोकरी दिली नाही…” –
निवृत्ती जाहीर करताना हर्षवर्धनने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. तो म्हणाला, “मी सरकारकडे नोकरीसाठी, गेलो होतो, पण या सरकारने मला नोकरी दिली नाही.” आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत त्याने चाहत्यांचे आभार मानले. एका बाजूला दोनदा महाराष्ट्र केसरी होण्याचा आनंद आणि दुसरीकडे एका महान मल्लाने घेतलेली अनपेक्षित निवृत्ती, यामुळे कुस्ती क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.





