संगमनेर – तालुक्यातील पठार भागात कुरकुटवाडी गावच्या शिवारात कोटमारा धरणाच्या कडेला रोडलगत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हिरा गुटखासह तब्बल 24 लाख 29 हजार 994 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. हा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.
संतोष राजेंद्र खैरे यांनी फिर्याद दिली. रात्रीच्या वेळी गुटख्याचा पिकअप जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी रात्री पठार भागात कुरकुटवाडी गांवचे शिवारात कोटमारा धरणाचे कडेला रोडलगत पिकअप गाडी (एम.एच. 10 सी. आर. 9762) आणि ईको गाडी (एम.एच. 01 डी. ई. 7966) या गाड्यांमध्ये हिरा पानमसाल्याच्या गोण्या, तसेच प्रतिबंधित सुंगधीत तंबाखूच्या गोण्या असा तब्बल 24 लाख 29 हजार 994 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अविनाश आण्णा कमलाकर, पिकअप चालक प्रमोद सदाशिव मोरे (रा. रुई, ता. हातकणंगले, जि.कोल्हापुर), ईको गाडी चालक संदीप गोरक्षनाथ शिंगवान, सागर रमेश नाईकवाडे, संदीप शिवाजी वाळुंज (रा. धामणगाव, ता. अकोले, जि. नगर), प्रकाश आनंदराव पाटील (रा. कोल्हापूर नाका, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), शुभम चेंडके (रा. शिवणकवाडी, ता. शिराळ, जि. कोल्हापूर), सनी उर्फ सनिल रमेश नाईकवाडे (रा. धामणगाव, ता. अकोले) (फरार), पिकअप गाडीचा मालक या नऊ जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.