लोणी काळभोर, (वार्ताहर)- ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, विद्यार्थ्यांचे बहारदार नृत्याविष्कार अशा प्रफुल्लीत वातावरणात मराठी नववर्ष (गुढीपाडव्याचा) हर्षोल्लास पहायला मिळाला.
विद्यापीठात देशाच्या कानाकोपर्यातून येणार्या विविध जात, धर्म, प्रांतांच्या विद्यार्थांना महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांचे प्रतिक या उत्सवाद्वारे दाखविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची पारंपारिक ओळख असणार्या शिवराय ढोल-ताशा पथकाच्या सुरेल वादनाने करण्यात आली. त्यानंतर झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत 25 हून अधिक नृत्ये सादर करण्यात आली.
महाराष्ट्रासह भारताच्या वेगवेगळ्या भागांतील संस्कृतींचे दर्शन घडविण्यात आले. लावणी, पोवाडे, जोगवा-गोंधळ, उत्सवी तेलंगण नृत्य, आकर्षक गरबा, नाजूक मोहिनीअट्टम, उत्साही बिहू नृत्य, अशा विविध प्रकारच्या नृत्याविष्कारांचा समावेश होता. नृत्य स्पर्धेत स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या आर्या नांबियारने विजेतेपद तर श्रुती खंडागरेने उपविजेतेपद पटकाविले.
गट प्रकारात लीप ऑफ ग्रेस ग्रुपच्या लावणी फ्युजनने बाजी मारली, तर ग्रूव्हन्स ग्रुपच्या आसामच्या बिहू नृत्याने दुसरा क्रमांक पटकावला. नृत्य स्पर्धेनंतर स्पेक्ट्र-4. 0 चे देखील आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या मंगलमय मुहुर्तावर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा डॉ मंगेश कराड यांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहासाठीच्या सह्याद्री क्रीडा संकुलाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ महेश चोपडे, विंग कमांडर मोहन मेनन, प्रा डॉ सुराज भोयर, प्रा. पद्माकर फड, प्रा. डॉ अतुल पाटील आदी उपस्थित होते.