Gold Silver Price Today: धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 400 रुपयांनी घसरून 60,950 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 61,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. या काळात चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी म्हणाले, “परदेशी बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 400 रुपयांनी घसरून 60,950 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. चांदीचा भावही 300 रुपयांनी घसरून 73,300 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे 1,950 डॉलर प्रति औंस आणि 22.45 डॉलर प्रति औंसवर घसरले.