MS Dhoni Post : ‘नेहमी गंभीर राहणारा गौतम हसल्यानंतर माहीला राहवलं नाही!’ विजयानंतर धोनीची ‘ती’ पोस्ट अन् गंभीरचं प्रत्युत्तर चर्चेत
MS Dhoni Post : विजयानंतर धोनीने सोशल मीडियावर टीम इंडियाचे कौतुक करतानाच गौतम गंभीरसाठी लिहिलेली खास ओळ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Gautam Gambhir reaction on MS Dhoni post : भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी स्वतः अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होता. विजयानंतर धोनीने सोशल मीडियावर टीम इंडियाचे कौतुक करतानाच गौतम गंभीरसाठी लिहिलेली खास ओळ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
धोनीची खास पोस्ट: ‘कोच साहेब, हे हसू छान वाटतंय!’ MS Dhoni Post
गौतम गंभीर हा मैदानावर सहसा गंभीर मुद्रेत दिसतो, मात्र विश्वचषक जिंकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण हास्य होते. हे पाहून धोनीने पोस्टमध्ये लिहिले की, “अहमदाबादमध्ये इतिहास घडला आहे. तुम्हा सर्वांना खेळताना पाहून आनंद झाला. कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावरील हे हसू छान वाटतंय. या स्माईल आणि इंटेसिटीचं कॉम्बिनेशन कमाल आहे. बुमराह तर चॅम्पियन बॉलर आहेच.”
View this post on Instagram
गौतम गंभीरची दोन वाक्यांतील प्रतिक्रिया –
Gautam Gambhir replied to MS Dhoni’s Instagram post ❤️
– 2011 World Cup Heroes in the final. pic.twitter.com/BBYmUfOGpK
— Johns Samson (@CricCrazyJohns) March 9, 2026
धोनीच्या या मिश्किल टीकेला गंभीरनेही तितक्याच आपुलकीने उत्तर दिले. त्याने कमेंटमध्ये लिहिले की, “आणि हसण्याचं किती चांगलं कारण आहे! तुला भेटून खूप आनंद झाला.” या दोघांमधील हा संवाद पाहून चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे, कारण अनेकदा या दोघांमध्ये कटुता असल्याच्या अफवा पसरवल्या जातात.MS Dhoni Post
गौतम गंभीरचा प्रशिक्षक म्हणून नवा विक्रम – MS Dhoni Post
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने टी-२० क्रिकेटमध्ये एकामागोमाग एक शिखरे सर केली आहेत. २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक जिंकल्यानंतर आता टी-२० विश्वचषक जिंकून गंभीरने इतिहास रचला आहे. सलग दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारे ते पहिले भारतीय मुख्य प्रशिक्षक ठरले आहेत. तसेच, खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांत विश्वचषक जिंकणाऱ्या क्रिकेटपटूंच्या विशेष यादीत आता गंभीरचा समावेश झाला आहे.





