Virat Kohli Insta story : ‘तूच खरा हकदार…!’ संजू सॅमसनच्या कामगिरीवर विराट कोहली फिदा; इंस्टावर शेअर केली भावनिक स्टोरी
Virat Kohli Insta story : संजूच्या या यशाने प्रभावित होऊन दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.

Virat Kohli Insta story share for Sanju Samson : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. या संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या संजू सॅमसनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संजूच्या या यशाने प्रभावित होऊन दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.
संजूची विक्रमी कामगिरी – Virat Kohli Insta story
संजू सॅमसनने या विश्वचषकातील शेवटच्या तीन सामन्यांत सलग तीन अर्धशतके झळकावून सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारताने एकूण ९ सामने खेळले, पण संजूला केवळ पाच सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या पाच सामन्यांत त्याने ८०.२५ च्या सरासरीने आणि १९९.३७ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटसह ३२१ धावा कुटल्या. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्यानंतर ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब जिंकणारा संजू हा तिसरा भारतीय ठरला आहे.
विराटची भावूक पोस्ट: “तूच खरा हकदार!” Virat Kohli Insta story
Virat Kohli’s Instagram story for Sanju Samson. 🥹❤️ pic.twitter.com/1bvrG6sXpI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 8, 2026
विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये संजूचा फोटो शेअर करत लिहिले, “या टी-२० विश्वचषकातील ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’चा खरा हकदार संजू तूच आहे! तुझ्यासाठी ही टूर्नामेंट खरचं खूप शानदार राहिली. जेव्हा संघाला तुझी सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तू सर्वोत्तम कामगिरी केलीस. तुझ्यासाठी खूप आनंदी आहे, चेट्टा!” विराटची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राखीव खेळाडू ते ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’चा प्रवास – Virat Kohli Insta story
सुरुवातीला संजू सॅमसन भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. खराब फॉर्ममुळे त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, अभिषेक शर्माच्या आजारपणामुळे त्याला नामिबियाविरुद्ध संधी मिळाली, जिथे त्याने ८ चेंडूत २२ धावा केल्या. त्यानंतर सुपर ८ फेरीत जेव्हा सलामीवीरांना ऑफ-स्पिनर्सविरुद्ध खेळताना अडचण येत होती, तेव्हा संजूला पुन्हा संधी देण्यात आली आणि त्याने त्या संधीचे सोने करत भारताला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.





