IND vs PAK : गौतम गंभीरने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

गौतम गंभीरचा विक्रमी प्रवास –
गंभीरने खेळाडू म्हणून 2007 चा टी-20 विश्वचषक, 2010 चा आशिया चषक आणि 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. जुलै 2024 मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्याने मार्च 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता 28 सप्टेंबर 2025 रोजी आशिया चषक जिंकून आपला दबदबा कायम ठेवला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताने एकही सामना न गमावता विजेतेपद पटकावले होते. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने बहु-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सर्व सामने जिंकले आहेत.
With Gautam Gambhir at the helm, India’s journey has seen both highs and lows. 🇮🇳🙌🏼
How would you rate his tenure as Head Coach? ✍🏼#Cricket #GautamGambhir #Sportskeeda pic.twitter.com/5Hhl0K3O4d
— Sportskeeda (@Sportskeeda) September 29, 2025
गौतम गंभीरने आतापर्यंत जिंकलेल्या आयसीसी स्पर्धा:
- टी -20 विश्वचषक 2007 – खेळाडू
- आशिया चषक 2010 – खेळाडू
- एकदिवसीय विश्वचषक 2011- खेळाडू
- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 – मुख्य प्रशिक्षक
- आशिया चषक 2025 – मुख्य प्रशिक्षक
गंभीरने रवि शास्त्रींवर केली मात –
यापूर्वी रवि शास्त्री यांनीही खेळाडू म्हणून आयसीसी स्पर्धा आणि एशिया चषक (दोनदा) तसेच मुख्य प्रशिक्षक म्हणून 2018 चा एशिया चषक जिंकला होता. मात्र, मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांना आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. गंभीरने ही कमतरता पूर्ण करत हा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
बीसीसीआयकडून 21 कोटींचे बक्षीस जाहीर –
या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी 21 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी 58 कोटी आणि टी-20 विश्वचषक 2024 साठी 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले होते. गेल्या 15 महिन्यांत तीन मोठ्या स्पर्धा जिंकून भारतीय संघाला एकूण 204 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
आणखी संबंधित बातम्या
Nana Patekar Death : "माझा 'नाना फ्रॉम पुना' आता आपल्याला...", नाना पाटेकरांच्या निधनानंतर सुनील गावस्करांची भावुक पोस्ट व्हायरल

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

