Gautam Gambhir : अर्शदीपच्या ७ वाईडनंतर गंभीरचा पारा चढला, हँडशेकमधला राग पाहिलात का? VIDEO व्हायरल

Gautam Gambhir Angry on Arshdeep Singh : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मुल्लानपूर येथे पार पडलेल्या या सामन्यात प्रथम गोलंदाज आणि त्यानंतर फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कमालीचे नाराज असल्याचे दिसून आले. त्यांचा हा संताप व्यक्त करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कटक येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली होती. मात्र, दुसऱ्या टी-२० सामन्यात आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग दोघेही महागडे ठरले. विशेषतः अर्शदीप सिंगसाठी हा सामना वाईट स्वप्नासारखा ठरला. त्याने एकाच षटकात ७ वाईड चेंडू टाकले, ज्यामुळे त्याला एक षटक पूर्ण करण्यासाठी १३ चेंडू टाकावे लागले.
गंभीरचा अर्शदीपवर संताप –
Gautam Gambhir is abusing arshdeep Singh in live match 🤡🤡🤡#INDvsSA #gautamgambhir pic.twitter.com/svrX5RFeqL
— Shankar (@Sunkissedsoul0) December 11, 2025
अर्शदीप गोलंदाजी करत असताना, कॅमेरामनने गौतम गंभीरकडे कॅमेरा वळवला, तेव्हा ते संताप व्यक्त करताना स्पष्टपणे दिसले. परंतु, त्यांची नाराजी सामन्याच्या निकालानंतर अधिक तीव्र झाली. सामन्यानंतर खेळाडूंशी हँडशेक करत असतानाचा गंभीर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करताना ते गंभीर दिसत होते. जेव्हा अर्शदीप सिंग हँडशेकसाठी पुढे आला, तेव्हा गंभीर यांनी त्याच्याकडे नीट पाहिलेही नाही आणि त्यांचे हावभाव रागात असल्याचे जाणवत होते.
हेही वाचा – India vs South Africa T20: डी कॉकच्या वादळी खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेचा भारतावर 51 धावांनी विजय
सामना संपल्यानंतर गंभीरचा व्हिडीओ व्हायरल –
After today’s loss, Gautam Gambhir was looking angry during the handshake with Indian players like Jitesh Sharma and Arshdeep Singh.
Look at the attitude of this man; rather than boosting the confidence of players, he was looking at them angrily 💔 pic.twitter.com/0nJTTZ8qfQ
— Tejash (@Tejashyyyyy) December 11, 2025
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या (९० धावा) धमाकेदार खेळीच्या जोरावर २० षटकांत २१३ धावांचा डोंगर उभा केला. २१४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. शुबमन गिल, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा हे प्रमुख फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.
हेही वाचा – Rupa Bayor : तायक्वोंडोपटू रूपा बायोरची जागतिक क्रमवारीत 8 व्या स्थानी झेप
अखेरीस, तिलक वर्माच्या दमदार अर्धशतकाने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने भारतीय संघ १६२ धावांत गारद झाला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ५१ धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.संघाच्या या फ्लॉप शोमुळे गंभीर यांची नाराजी साहजिकच असून, या व्हिडीओमुळे आता चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.





