IND vs AUS : पराभवानंतर संतापाचा उडाला भडका…? गौतम गंभीरचं म्हणणं शांतपणे ऐकताना दिसला सूर्या, पाहा VIDEO

IND vs AUS Gambhir Angry on Surya : भारताला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून चार विकेट्सनी पराभव पत्करावालागला. या पराभवामुळे भारतीय संघ मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडला आहे. विशेष म्हणजे, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवामुळे अत्यंत नाराज झाल्याची चर्चा आहे. सामन्यानंतर सूर्या आणि गंभीर यांचा चर्चा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यावरुन चांहत्यांनी अंदाज बांधला आहे की गंभीर हे सूर्यावर संतापले आहेत.
पराभवानंतर गंभीर यांचा चढला पारा?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा संताप पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने रोमांचक सामन्यात भारताचा ४ गडी राखून पराभव केल्यानंतर ही घटना घडली. वनडे मालिकेतील पराभवानंतर टी-२० मालिकेचीही खराब सुरुवात झाल्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का होता.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) October 31, 2025
फलंदाजांची निराशाजनक कामगिरी –
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने अत्यंत निराशाजनक प्रदर्शन केले. संघातील केवळ दोन फलंदाजच काही खास कामगिरी करू शकले. अभिषेक शर्माने ३७ चेंडूंमध्ये ६८ धावांची शानदार खेळी केली, तर हर्षित राणाने ३५ धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणताही फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करू शकला नाही आणि संपूर्ण संघ १२५ धावांवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने आपल्या चार षटकांत अवघ्या १३ धावा देत ३ बळी घेतले.
गंभीर-सूर्यकुमार यांच्यातील चर्चेचा व्हिडीओ व्हायरल –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मैदानावरच सूर्याशी चर्चा करताना दिसले. ज्यामुळे चाहते असा अंदाज लावत आहेत की गंभीर यांनी रागाच्या भरात सूर्याला सुनावले. या चर्चेवेळी संघाचे इतर सदस्य जसे की मोर्ने मोर्केल आणि रायन टेन डोशेट हे देखील उपस्थित होते. गंभीर आपली निराशा व्यक्त करत होते आणि सूर्यकुमार यादव गंभीर यांना काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होते, असे दिसत होते.





