Tilak Varma : तिलक वर्मामध्ये संचारला सुपरमॅन! बाउंड्रीवर हवेत डाईव्ह मारत अडवला षटकाराचा चेंडू, पाहा VIDEO

Tilak Varma Fielding Video Viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३५९ धावांचे विशाल आव्हान ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली, पण याच दरम्यान सीमारेषेवर सब्स्टीट्यूट खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या तिलक वर्माने आपल्या अविश्वसनीय क्षेत्ररक्षणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तिलकच्या अविश्वसनीय क्षेत्ररक्षणाने वाचवल्या ५ धावा –
भारताने दिलेल्या ३५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर क्विंटन डीकॉक स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा आणि एडन मार्करम यांनी डाव सावरला. ही जोडी चांगली जमलेली असताना भारताकडून २० वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला. कुलदीपने टाकलेल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मार्करमने डीप मिडविकेटच्या दिशेने एक खणखणीत शॉट मारला.
TILAK VARMA SAVED 5 RUNS 🤯
– The commitment of Tilak, coming as Sub fielder for the country. pic.twitter.com/kI5zqoo7F3
— Johns. (@CricCrazyJohns) December 3, 2025
तिलकमध्ये संचारला सुपरमॅन –
What a brilliant save by Tilak Varma 🔥pic.twitter.com/oYKIYDRD0N https://t.co/HE9k7o20Yg
— ⁴⁵ (@eremika_45) December 3, 2025
हा चेंडू वेगाने सीमारेषेच्या पार षटकारासाठी जात होता. नेमक्या त्याच वेळी सीमारेषेवर असलेल्या सब्स्टीट्यूट खेळाडू तिलक वर्माने ‘सुपरमॅन’प्रमाणे हवेत उंच उडी घेतली आणि डाईव्ह मारून चेंडू पकडला. झेल घेतल्यानंतर त्याचा तोल जात असल्याचे पाहून त्याने चेंडू पुन्हा मैदानात फेकला. या अविश्वसनीय क्षेत्ररक्षणामुळे संघाने ५ धावा वाचवल्या. तिलक वर्माने दाखवलेल्या या ‘षटकार वाचवणाऱ्या’ तत्परतेमुळे सर्व खेळाडू आणि चाहते प्रभावित झाले.
हेही वाचा – IND vs SA : विराटच्या बुलेट शॉटने थरकाप उडाला! ऋतुराज थोडक्यात बचावला, पाहा VIDEO
विराट-ऋतुराजने झळकावली शतक –
भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ गडी गमावून ३५८ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर ३५९ धावांचे मोठे आव्हान उभे केले. या सामन्यात टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली; रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल स्वस्तात बाद झाले. मात्र, यानंतर ऋतुराज गायकवाड (१०५ धावा) आणि विराट कोहली (१०२ धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची विक्रमी भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढले.
ऋतुराजचे हे पहिले वनडे शतक होते, तर विराटने मालिकेत सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ५३ वे शतक झळकावले. दोन्ही फलंदाज शतक झाल्यावर लगेच बाद झाले. अखेरीस, कर्णधार केएल राहुल (नाबाद ६६) आणि रवींद्र जडेजा (नाबाद २४) यांनी शेवटच्या षटकांमध्ये दमदार फलंदाजी करत संघाचा स्कोर ३५० च्या पार नेला. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को यानसेनने २ विकेट्स घेतल्या.





