थेऊर, (वार्ताहर) –अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी देवतेच्या जन्म सोहळ्यानिमित्त तसेच महानसाधू मोरया गोसावी व श्री चिंतामणी महाराज देव यांच्या जन्मसोहळ्यानिमित्ताने गणेश कथा व महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भारतातील पहिल्या गणेश कथाकार रुक्मिणीआई तारू महाराज व चिंतामणी तारू महाराज यांनी दिली.
मागील 20 वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. हा सोहळा दि. 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत श्रीक्षेत्र थेऊर येथील चिंतामणी मंदिरात होणार आहे. श्री चिंतामणीची महापूजा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कलश पूजन रामदरा येथील हेमंतपुरी महाराज, विणापूजन पांडुरंग काळे, ग्रंथ पूजन मंदार महाराज देव (मुख्य विश्वस्त), जितेंद्र महाराज देव, केशव उमेश विध्वंस, राजेंद्र उमाप व थेऊर ग्रामस्थ व यांच्या उपस्थितीत होणार आहे.