Pune News : अश्लील डीजे लावणीवर चाप बसणार! जिल्ह्यात विशेष ‘भरारी पथके’ स्थापन करण्यास सरकार सकारात्मक
Pune News : राज्यात वाढत चाललेल्या अश्लील डीजे लावणी प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष भरारी पथके स्थापन करण्याच्या मागणीवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.

Pune News : राज्यात वाढत चाललेल्या अश्लील डीजे लावणी प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष भरारी पथके स्थापन करण्याच्या मागणीवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली. (Pune News)
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव किरण कुलकर्णी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्यातील लोककला, लावणी, तमाशा आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली. (Pune News)
बैठकीला बाबासाहेब पाटील यांच्यासह सुरेखा पुणेकर, रेश्मा परितेकर, मोहित नारायणगावकर, नारायण जवळेकर, नितीन धावणे पाटील आणि अभिनेत्री अपेक्षा चव्हाण उपस्थित होत्या. (Pune News)
बैठकीत अश्लील डीजे लावणी प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष भरारी पथके स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना लावणी सादरीकरणाबाबत आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. (Pune News)
तसेच लावणी, तमाशा आणि लोककलेसाठी स्वतंत्र नियमावली तयार करणे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पूर्वपरवानगी अनिवार्य करण्याबाबत तसेच पारंपरिक लोककलेच्या संवर्धनासाठी कलाकार व संबंधित संघटनांकडून सूचना मागविण्याबाबतही चर्चा झाली. (Pune News)
याशिवाय लुप्त होत चाललेल्या टुरिंग टॉकीजना आर्थिक मदत, बंद पडणाऱ्या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांसाठी विशेष पॅकेज, लोकशाहीर विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाचा विकास, दादासाहेब फाळके स्मारकाचे संवर्धन, चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणादरम्यान अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी तसेच चित्रपट चित्रीकरणासाठी परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासंदर्भातील विविध विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. (Pune News)
Pune News : दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचे भव्य आयोजन





