अर्थमंत्र्यांनी एक आर्थिक ज्योतिषी नियुक्त करावा; माजी केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला

नवी दिल्ली – नासाच्या नव्या दुर्बिणीने ब्रह्मांडातील आतापर्यंतची सगळ्यांत वेगळी छायाचित्रे पाठवली आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ती छायाचित्रे ट्विट केली असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही एक ट्विट करत सीतारामन यांना टोमणा मारला आहे.
अर्थमंत्र्यांनी एक आर्थिक ज्योतिषी नियुक्त करावा, असा सल्ला चिदंबरम यांनी दिला आहे. चिदंबरम म्हणाले की, देशातील महागाईचा दर 7.01 टक्के आणि बेरोजगारीचा दर 7.8 टक्क्यांवर गेला आहे. त्या दिवशी अर्थमंत्री सीतारामन यांनी गुरू, प्लुटो आणि सूर्य आदी ग्रहांची छायाचित्रे ट्विट केली आहेत.
कायदा सगळ्यांसाठी की फक्त मुसलमानांसाठी; वरिष्ठ अधिवक्ता रिझवान अहमद यांचा सवाल
मात्र, याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. आपले स्वत:चे कौशल्य आणि आर्थिक सल्लागारांची योग्यता यावरचा विश्वास ढळल्यानंतर अर्थमंत्र्यांनी भारताची अर्थव्यवस्था कशी वाचवता येईल याकरता आता ग्रहांना आवाहन केले आहे. त्याची सुरुवात त्यांनी एक नवे मुख्य आर्थिक ज्योतिषींच्या नियुक्तीपासून करावी, असा सल्ला त्यांनी दिला.





