नवी दिल्ली – उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे समजते आहे. आझाद यांच्या नावाला बहुतेक विरोधी नेत्यांकडून कोणतीही हरकत नाही.
मात्र उमेदवाराबाबत कॉंग्रेसकडून अद्याप काहीही सूचित करण्यात आलेले नाही. निवडणूकीसाठी कॉंग्रेस आपल्या कोणत्याही नेत्याचे नाव सुचवणार नाही. सर्व विरोधी पक्षांकडून एकमताने जे नाव निश्चित केले जाईल, त्याला पाठिंबा दिला जाईल, असे कॉंगेसने म्हटले आहे.
कॉंग्रेसमधील 23 असंतुष्ट नेत्यांच्या गटाचे प्रतिनिधीत्व आझाद करत आहेत. त्यामुळे त्यांचे आणि कॉंग्रेस नेतृत्वाचे संबंध ताणलेले गेले आहेत. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जम्मू काश्मीरमधील नेत्यांशी गेल्या दोन दिवसात चर्चा केली.
हिंसाचार वाढल्यामुळे श्रीलंकेत पश्चिम प्रांतात संचारबंदी लागू
आझाद हे पूर्वी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनाही आझाद यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी सुचवले जाण्यात कोणतीही हरकत नाही. या बैठकीला स्वतः आझाद हे देखील उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; 92 नगरपरिषदा, चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित