पुणे/रायगड : पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. घाटातील एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक थार (Thar) गाडी सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी दरीत कोसळलेल्या गाडीचा व मृतदेहांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. सध्या दरीतून आणखी प्रवाशांचा शोध व मृतदेह बाहेर काढण्याचे बचाव कार्य सुरू आहे. माणगाव पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. थार गाडी दरीत कोसळल्याने मोठा हाहाकार माजला. या घटनेची अधिकृत माहिती आणि अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास करत आहेत.