Solapur News : सोलापुरात बोगस मॅट्रिमोनी रॅकेट उद्ध्वस्त; विजापूर नाका पोलिसांची धडक कारवाई, ६ जण गजाआड
Solapur News : लग्न जुळवण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा विजापूर नाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Solapur News : लग्न जुळवण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा विजापूर नाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातून पोलिसांनी या गुन्ह्यातील ६ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्याशी संबंधित मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Solapur News)
दिनांक १८ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपींनी कट रचून फिर्यादी सुरज संजय पवार (वय ३१, रा. गुरुदत्त नगर, सैलफुल, विजापूर रोड, सोलापूर) यांना विवाह करून देण्याचे आश्वासन दिले. (Solapur News)
एजंट ज्योती लोंढे, सचिन शिंदे, योगिता सूर्यवंशी, सुनिता दाभाडे, दत्तात्रय सूर्यवंशी आणि कैलास शिंदे यांनी फिर्यादीकडून विविध कारणांसाठी वेळोवेळी एजंट फी म्हणून २,१७,५०० रुपये उकळले. (Solapur News)
यानंतर योगिता हिचा विवाह फिर्यादीशी लावून देण्यात आला. विवाहानंतर योगिता फिर्यादीच्या घरी राहण्यास आल्यावर तिने वेगवेगळ्या अटी व कारणे सांगून घरातून लांब राहणे पसंद केले आणि फिर्यादीच्या घरातील रोख रक्कम तसेच दागिन्यांची माहिती मिळवली. (Solapur News)
त्यानंतर ती फिर्यादीच्या आईचे दीड तोळ्यांचे सोन्याचे दागिने व घरातील १,००,००० रुपये रोख घेऊन पसार झाली. या प्रकरणी फिर्यादी सुरज पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur News)
यानंतर विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) संतोष काजळे व तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अत्यंत वेगाने तपास चक्रे हलवली. (Solapur News)
पोलिसांनी एकूण ४ वेगवेगळी पथके तयार करून पुणे, जालना आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून आरोपींना ताब्यात घेतले. या आंतरजिल्हा रॅकेटचे जाळे इतरत्र कुठे पसरले आहे का आणि आरोपींचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. (Solapur News)





