Prasidh Krishna Out : किवींविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला धक्का! प्रमुख गोलंदाज जायबंदी; पाहा कोणाला मिळणार संधी
Prasidh Krishna Out : न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी नवीन खेळाडूची घोषणा लवकरच केली जाऊ शकते.

Prasidh Krishna Ruled Out of New Zealand ODI Series Auqib Nabi in Contention : न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरू शकलेला नाही. त्यामुळे ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून तो बाहेर पडला आहे. प्रसिधच्या अनुपस्थितीत इंडिया ‘ए’ संघाकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या युवा वेगवान गोलंदाज आकिब नबी याला भारतीय संघात संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
१ आणि २ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये फिटनेस टेस्ट –
प्रसिध कृष्णा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात बेंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (CoE) मध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. त्याच्या मॅच फिटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी १ आणि २ नोव्हेंबर रोजी मॅच सिम्युलेशन आणि विशेष फिटनेस चाचणी होणार आहे. मात्र, तंदुरुस्त होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याने तो न्यूझीलंडविरुद्धच्या संपूर्ण एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कसोटी मालिका लक्षात घेऊन निवड समितीचा सावध पवित्रा –
🚨 UPDATE 🚨
Prasidh Krishna is scheduled to undergo match simulations at the CoE on November 1 and 2, putting his participation in the ODI series against New Zealand in serious doubt.
Prasidh has been out since September 30 with a hamstring injury. He underwent a match simulation on October 22, and despite satisfactory clinical progress, he has reported some apprehension. #NZvIND
— Cricbuzz (@cricbuzz) October 28, 2026
बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, प्रसिधची दुखापत वेगाने बरी होत आहे; मात्र संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समिती त्याला घाईघाईने मैदानात उतरवण्याच्या बाजूने नाहीत. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी प्रसिद्धने १०० टक्के तंदुरुस्त राहावे, असा संघ व्यवस्थापनाचा आग्रह आहे. एकदिवसीय सामन्यांपेक्षा कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या अचूक टप्प्याची आणि उसळीची संघाला जास्त गरज भासणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत झाली होती दुखापत –
प्रसिध कृष्णाला घरच्या मैदानावर पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असून पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्यासाठी मेहनत घेत आहे. गोलंदाजांच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करून निवड समिती त्याच्या बाबतीत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.
आकिब नबीच्या नावाची जोरदार चर्चा –
प्रसिधच्या जागी जम्मू-काश्मीरच्या आकिब नबी याच्या नावाला संघात समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे. नुकत्याच लिंकन येथे पार पडलेल्या न्यूझीलंड ‘ए’ विरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात आकिबने आपल्या धारदार माऱ्याने सर्वांना प्रभावित केले होते. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले असून, प्रसिद्धच्या अनुपस्थितीत त्याला वरिष्ठ भारतीय संघात पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते.





