MLC Election : अजून एक पदवीधर मतदारसंघ भाजपच्या हातातून जाणार? सुधाकर कोहळेंची आघाडी घटली
MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीने अत्यंत नाट्यमय वळण घेतले आहे.

MLC Election : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे उमेदवार ॲड. अभिजीत वंजारी यांच्यातील लढत अधिक चुरशीची झाली आहे. (MLC Election)
सुरुवातीला चार हजारांहून अधिक मतांची आघाडी घेणाऱ्या सुधाकर कोहळे यांचे मताधिक्य आता घटून सुमारे १,२०० मतांवर आल्याची माहिती समोर आली आहे. (MLC Election)
दुसऱ्या पसंतीच्या मतांनी फिरवले गणित
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर होते. मात्र, त्यांना विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आला नसल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. (MLC Election)
अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सुधाकर कोहळे यांची आघाडी लक्षणीयरीत्या घटली आहे. (MLC Election)
भाजपची आघाडी घटली; निकालाकडे लक्ष
उपलब्ध आकडेवारीनुसार, सुधाकर कोहळे अद्याप आघाडीवर असले तरी त्यांचे मताधिक्य सुमारे १,२०० मतांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता वाढल्याची चर्चा सुरू आहे. (MLC Election)
दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अभिजीत वंजारी यांच्या मतांमध्ये आणखी वाढ होते का आणि सुधाकर कोहळे आपली आघाडी टिकवून ठेवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (MLC Election)
MLC Election Result : पुण्यात विधान परिषदेत मोठा उलटफेर; पदवीधरमध्ये धक्कादायक निकाल




