Pratap Asbe : ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन
सोलापूरचे भूमीपुत्र ,ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे (Pratap Asbe) यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

Pratap Asbe : सोलापूरचे भूमीपुत्र ,ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे (Pratap Asbe) यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशनचे व्यवस्थापकीस संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे हे त्यांचे पुत्र होत.
त्यांचे पार्थिव (Pratap Asbe) उद्या सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या वांद्रे पूर्व येथील घरी नेण्यात येणार असून त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत साडेअकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रताप आसबे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झाला होता. शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर ते युवक चळवळीकडे ओढले गेले.
कॅपिटेशन फी विरोधातील आंदोलन, राशीनमधील शेतमजूरांसाठी राशीन कम्युनचा प्रयोग, त्यानंतर तत्कालिन मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आंदोलन व मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन याच्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. याच काळात त्यांना काही काळ तुरूंगवासही भोगावा लागला.
त्यानंतर आसबे (Pratap Asbe) यांनी पूर्णवेळ पत्रकारिता केली. प्रारंभी नवशक्ती व त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी काम केले. निवृत्तीनंतर काही वृत्तवाहिन्यांवरही त्यांनी राजकीय विश्लेषकाची भूमिका बजावली.






