लंडन : एका सर्वात महागड्या घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये दुबईच्या शासनकर्त्याला लंडनमधील न्यायालयाने त्याच्या पत्नीला तब्बल 55 अब्ज रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. दुबईचे बसध्याचे शासनकरते शेख महंमद रशीद यांच्या सहाव्या पत्नीला एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचे आदेश लंडनच्या न्यायालयाने दिले आहेत.
2019 मध्ये तिने इंग्लंडमध्ये आश्रय घेतला होता, त्यानंतर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामध्ये न्यायालयाने सर्व बाजू ऐकून शेख महंमद यांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलांना 55 अब्ज रुपये भरपाई द्यावी असा आदेश दिला आहे. पत्नी हया आबिद हुसेन यांना 25 अब्ज रुपये आणि दोन मुलांना उरलेले 30 अब्ज रुपये भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
मोहम्मद हे 72 वर्षाचे असून ते संयुक्त अरब अमिरतीचे पंतप्रधानही आहेत. त्यांच्या सहाव्या पत्नीला एवढी मोठी भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ती पत्नी राजकुमारी हया ही जॉर्डनच्या राजाची मुलगी म्हणजेच राजकन्या होती पतीबरोबर न पटल्याने तिने दुबई सोडून इंग्लंडमध्ये आश्रय घेतला होता आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली होती.